ओटीटी विश्व म्हणजे अक्षरशः मनोरंजनाचा खजिनाच आहे. अनेक लोक घरी बसून छान ओटीटीवरचे काही चित्रपट एन्जॉय करताना दिसतात. अगदी जुन्या प्रसिद्ध चित्रपटांपासून ते काल-परवा आलेल्या चित्रपटापर्यंत सगळेच चित्रपट आता ओटीटीवर बघता येतात. तुम्ही देखील या आठवड्यात घरीच बसून काही चित्रपट बघण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी नतक्की वाचा...
गेल्या काही दिवसांपासून ओटीटीवर अनेक नवे, जुने सिनेमे प्रदर्शित होताना दिसत आहेत. आता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डिझ्ने हॉटस्टार, जिओ सिनेमा, झी ५, नेटफ्लिक्स अन् प्राईम व्हिडिओवर मनोरंजनाचा धमाका होणार आहे. त्यामुळे चला जाणून घेऊया कोणते नवे चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत.
वाचा: ‘मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’, केतकी चितळे असे का म्हणाली? पाहा व्हिडीओ
'मिस्टर अँड मिसेस स्मिथ' हा चित्रपट २ फेब्रुवारीला अॅमेझॉन या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दोन अनोळथी व्यक्तींची कथा मांडण्यात आली आहे. त्यांना गुप्तहेर म्हणून नोकरी मिळते. त्यानंतर त्यांचे आयुष्य बदलत जाते.
प्रसिद्ध लेखर हार्डिन स्कॉट यांचा 'आफ्टर इव्हरेथिंग' हा चित्रपट १ फेब्रुवारी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जोसेफ लँगफोर्ड आणि फिनेस टिफेन हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
Dawshom Awbotaar हा चित्रपट होईचोई या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सीरिअल किलरची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. चित्रपटात जिशू सेनगुप्ता, प्रोसेनजित चॅटर्जी, अनिर्बन भट्टाचार्य आणि जया अहासन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
ओरियन अँड द डार्क नावाच्या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. हा चित्रपट २ फेब्रुवारी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
या आठवड्यात जर तुम्हाला काही अॅनिमेटेड सीरिज पाहण्याची इच्छा असेल तर नेटफ्लिक्सवर २९ जानेवारी रोजी माईटी भीम प्रदर्शित होणार आहे. तुम्ही घर बसल्या ही सीरिज पाहू शकता.
संबंधित बातम्या