Ketaki Chitale: ‘मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’, केतकी चितळे असे का म्हणाली? पाहा व्हिडीओ
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ketaki Chitale: ‘मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’, केतकी चितळे असे का म्हणाली? पाहा व्हिडीओ

Ketaki Chitale: ‘मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’, केतकी चितळे असे का म्हणाली? पाहा व्हिडीओ

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 27, 2024 09:20 AM IST

Ketaki Chitale Video: सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री केतकी चितळेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती ‘मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ असे म्हणत स्वत:ची जात सांगताना दिसत आहे.

Ketaki Chitale
Ketaki Chitale

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतच्या सर्व मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत. आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी स्वत: पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना मराठी अभिनेत्री केतकी चितळेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिची जात सांगताना दिसत आहे.

केतकीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती जातीय सर्व्हे करणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रश्न विचारताना दिसत आहे. प्रजासत्ताक दिनी जात विचारली जात असल्याचे केतकी चितळे म्हणाली आहे. जाती भेदाचे कायदे केले जात आहेत, असे केतकी म्हणाली आहे.
वाचा: आसमानी मोहब्बत! कसा आहे दीपिका आणि हृतिकचा 'फायटर?', वाचा रिव्ह्यू

काय म्हणाली केतकी?

एका महिला कर्मचाऱ्याला केतकी प्रश्न विचारताना दिसत आहे. “तुम्ही महापालिकेतून आल्या आहेत ना? तुम्ही सर्वांना जात विचारत आहात, आरक्षण की ओपन म्हणून, का?”, असा प्रश्न केतकीने विचारला आहे. त्यावर त्या महिलेने मराठा आरक्षणासाठी सर्वे सुरु आहे असे सांगितले. “आरक्षण भेटण्यासाठी सर्व्हे सुरु आहे. आज गणतंत्र दिवस आहे. तुम्हीपण मराठा म्हणजे माझ्यावर अॅट्रोसिटी टाकणार नाहीत, धन्यवाद मॅडम!” असे केतकी म्हणाली.

यानंतर संबंधित कर्मचारी तुमची जात मराठा आहे का? असा प्रश्न विचारते. त्यावर केतकी अजिबात नाही. “चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण”, असे उत्तर केतकी देते. “आज रिपल्बिक डे आहे आणि आरक्षणासाठी लोकं प्रश्न विचारत आहेत. महापालिकेकडून लोकं प्रश्न विचारायला येत आहेत. इन द सेन्स, संविधान सर्वांसाठी समान नाही. सर्वांसाठी सर्व कायदा एक नाहीत. ते आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुरु आहे. तुम्ही का विचार करता? प्रत्येकासाठी आपला कायदा समान आहे की जातीनुसार वेगवेगळे कायदे, नियम बनवले जात आहेत?”, असा सवाल केतकी या व्हिडीओत करताना दिसत आहे.

Whats_app_banner