SRI Biopic: उद्योगपती श्रीकांत भोल्लाचा प्रेरणादायी प्रवास मोठ्या पडद्यावर! ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  SRI Biopic: उद्योगपती श्रीकांत भोल्लाचा प्रेरणादायी प्रवास मोठ्या पडद्यावर! ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

SRI Biopic: उद्योगपती श्रीकांत भोल्लाचा प्रेरणादायी प्रवास मोठ्या पडद्यावर! ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

Feb 15, 2024 07:32 PM IST

SRI Biopic Release Date Out: बॉलिवूडचा ‘पॉवरपॅक परफॉर्मर’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता राजकुमार राव हा त्याच्या आगामी ‘श्री’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.

SRI Biopic Release Date Out
SRI Biopic Release Date Out

SRI Biopic Release Date Out: बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव हा कायम हटके आणि वेगवेगळ्या भूमिका साकारणारा गुणी अभिनेता म्हणून ओळखला जातो. आजवरच्या त्याच्या संपूर्ण बॉलिवूड कारकिर्दीत राजकुमार राव याने वेगवेगळ्या चित्रपटांची आणि पात्रांची निवड करून मोठ्या पडद्यावर उत्तम भूमिका साकारल्या आहेत. आता अभिनेता राजकुमार राव त्याच्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. बॉलिवूडचा ‘पॉवरपॅक परफॉर्मर’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता राजकुमार राव हा त्याच्या आगामी ‘श्री’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला असून, या आगामी चित्रपटातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणार आहे. ‘स्त्री’, ‘न्यूटन’, ‘शादी में जरूर आना’ यांसारख्या चित्रपटांतून त्याने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केले आहे. आता त्याच्या ‘SRI’ या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली असून, यातून तो काय वेगळं प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

‘श्री’ या चित्रपटाची ही घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची वाट पाहत होते. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून, राजकुमार राव अभिनित ‘SRI’ हा चित्रपट एका आठवड्याने पुढे ढकलल्यानंतर आता १७ मे २०२४ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. राजकुमार राव याची मुख्य भूमिका असलेल्या या बायोपिक चित्रपटात अभिनेत्री ज्योतिका, अलाया एफ आणि अभिनेता शरद केळकर यांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा उद्योगपती श्रीकांत भोल्ला यांच्या प्रेरणादायी प्रवासाभोवती फिरणारी आहे.

Tharala Tar Mag 15th Feb: चैतन्य आणि अर्जुनच्या मैत्रीत पडणार फूट; नोकरीतूनही देणार राजीनामा!

गुलशन कुमार आणि टी-सीरिज आता आणखी एक मनोरंजक धमाल चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘SRI’ हा चित्रपट टी-सीरिज सादर करत असून, टी-सीरिज फिल्म्स आणि चॉक अँड चीज प्रॉडक्शन एलएलपी अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होत आहे. राजकुमार राव याच्या ‘SRI’ दिग्दर्शन तुषार हिरानंदानी करत असून, भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि निधी परमार-हिरानंदानी हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘SRI’ हा या वर्षी १७ मे रोजी जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

सध्या राजकुमार राव याच्या हातात अनेक चित्रपट असून, सध्या तो ‘स्त्री २’, ‘मिस्टर अँड मिसेस माही’, ‘गन्स अँड गुलाब्स सीझन २’ आणि ‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’मध्ये देखील दिसणार आहे. सध्या राजकुमार राव अभिनेत्री तृप्ती डिमरीसोबत ऋषिकेशमध्ये शूटिंग करत आहे.

Whats_app_banner