Viral Video: चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहचलेल्या अक्षय-टायगरवर लोकांनी केला चपलांचा मारा! व्हिडीओ होतोय व्हायरल
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहचलेल्या अक्षय-टायगरवर लोकांनी केला चपलांचा मारा! व्हिडीओ होतोय व्हायरल

Viral Video: चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहचलेल्या अक्षय-टायगरवर लोकांनी केला चपलांचा मारा! व्हिडीओ होतोय व्हायरल

Feb 28, 2024 10:23 AM IST

Akshay Kumar-Tiger Shroff Viral Video: संतप्त जमावाचा राग पाहून यावेळी अक्षय कुमारने चाहत्यांना शांत होण्यास सांगितले. त्याने उशीर झाल्याबद्दल सगळ्यांची माफी देखील मागितली.

Akshay Kumar-Tiger Shroff Viral Video
Akshay Kumar-Tiger Shroff Viral Video

Akshay Kumar-Tiger Shroff Viral Video: अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ त्यांच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लखनौला पोहोचले होते. या कार्यक्रमात पोहोचण्यासाठी त्यांना बराच उशीर झाल्याने तिथे जमलेली गर्दी चांगलाच गोंधळ घालू लागली होती. यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षारक्षकांनी लाठीचार्ज करायला सुरुवात केली. यावेळी चिडलेल्या लोकांनी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या दिशेने चपला फेकायला सुरुवात केली. संतापलेल्या चाहत्यांनी कलाकारांवर इतक्या चपला भिरकावल्या की, त्यातील जवळपास ८ चपला स्टेजवर पडल्या. या संतप्त जमावातील एकाने आपले हेल्मेट देखील दोघांच्या दिशेने फेकले. यावेळी अक्षय आणि टायगर दोघेही स्टेजवर स्टंट करत होते. अखेर परिस्थिती पाहून, अक्षय कुमारला हात जोडून लोकांना शांत बसण्यास सांगावे लागले. मात्र, तरीही गर्दी ऐकत नसल्याचे दिसताच सुरक्षा रक्षकांनी कलाकारांना वेळीच स्टेजच्या मागच्या बाजूला नेले. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती.

सोमवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ दोघे त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लखनऊच्या घंटाघरमध्ये पोहोचले होते. यावेळी टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारला पाहून गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. या गोंधळात लोकांनी चपला भिरकावण्यास सुरुवात केली होती. यातील काही चप्पल स्टेजसमोर पडल्या, तर काही गर्दीमुळे मागे पडल्या.

Viral Video: पंकज उधास यांच्या अंत्ययात्रेत विद्या बालनच्या मागे लागला चाहता! व्हिडीओ पाहून नेटकरीही संतापले

सुरक्षा रक्षकांनी अक्षय-टायगरला वाचवले!

यावेळी गर्दीचा वाढता संताप पाहून अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफला वाचवण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी त्यांना स्टेजच्या मागे नेले. इतकेच नाही, तर या जमावातील काही लोकांनी स्टेजच्या दिशेने हेल्मेट फेकले, त्यामुळे काही लोक जखमी होण्याची शक्यता देखील होती. यादरम्यान अक्षय कुमारने टायगर श्रॉफला एक स्टंट दिला होता, ज्यामध्ये त्याला पाण्याच्या बाटलीला लाथ मारायची होती. अक्षय कुमारच्या हातात बाटली होती आणि टायगर श्रॉफने एकदा नव्हे, तर तीन वेळा वेगवेगळ्या बाटल्यांना लाथ मारून आपला स्टंट दाखवला. यावेळी दोन्ही कलाकारांनी त्यांच्या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवर जोरदार डान्स देखील केला.

संतप्त जमावाचा राग पाहून यावेळी अक्षय कुमारने चाहत्यांना शांत होण्यास सांगितले. त्याने उशीर झाल्याबद्दल सगळ्यांची माफी देखील मागितली. यावेळी त्याने आपण लखनौमध्ये ५ चित्रपटांचे शूटिंग केल्याचे देखील म्हटले. त्याचे हे पाचही चित्रपट हिट ठरले होते. त्यामुळे हा आगामी चित्रपट देखील लखनौच्या लोकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा त्याने व्यक्त केली. 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट २०२४च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.

Whats_app_banner