Pankaj Udhas Funeral Viral Video: प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांनी २६ फेब्रुवारी रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर २७ फेब्रुवारी रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकार पंकज उधास यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले होते. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन देखील या अंत्ययात्रेत सामील झाली होती. मात्र, यावेळी एक व्यक्ती सेल्फी काढण्यासाठी अभिनेत्रीच्या मागे लागला. अनेकवेळा नकार देऊनही त्या व्यक्तीने विद्या बालनचा पाठपुरावा करणे थांबवले नाही. या संपूर्ण कृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर, हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरीही संतापले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अभिनेत्री विद्या बालन गझल गायक पंकज उधास यांना अखेरचा निरोप देण्यासाठी या अंत्ययात्रेत पोहोचली होती. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने अभिनेत्रीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. हा व्यक्ती सेल्फी काढण्यासाठी विद्याच्या मागे लागला होता. विद्याने अनेकदा नकार दिल्यानंतरही तो माणूस तिचा पिच्छा सोडत नव्हता. त्या व्यक्तीने वारंवार अभिनेत्रीसोबत सेल्फी काढण्याचा आग्रह धरला होता.
यावेळी केवळ विद्या बालनच नव्हे, तर तिच्यासोबत उपस्थित असलेल्या एका महिलेने त्या व्यक्तीला अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यक्ती काही केल्या ऐकतच नव्हता. या व्हिडीओमध्ये हा व्यक्ती विद्या बालनसोबत सेल्फी घेण्याचा वारंवार आग्रह करताना दिसत आहे. या व्यक्तीच्या या कृतीमुळे अभिनेत्रीही चांगलीच नाराज झालेली दिसली. मात्र, तिने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि तेथून शांतपणे आत निघून गेली.
दुसरीकडे, सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच, नेटिझन्सनी त्या व्यक्तीच्या कृतीवर टीका करण्यास सुरुवात केली. मात्र, नेटकरी अभिनेत्रीच्या संयमाचे कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनसह मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकार पंकज उधास यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते. यावेळी सोनू निगम आणि अनुप जलोटाही पंकज उधास यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. गझल गायक पंकज उधास यांच्यावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या