मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Varsha Usgaonkar Birthday: मराठी मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल ‘हे’ माहितीय?

Varsha Usgaonkar Birthday: मराठी मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल ‘हे’ माहितीय?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 28, 2024 08:53 AM IST

Happy Birthday Varsha Usgaonkar: अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी केवळ मराठी मनोरंजन विश्वच नाही, तर हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.

Happy Birthday Varsha Usgaonkar
Happy Birthday Varsha Usgaonkar

Happy Birthday Varsha Usgaonkar: मराठी चित्रपटसृष्टीमधली ‘एव्हरग्रीन’ अभिनेत्री म्हणून वर्षा उसगांवकर यांचे नाव घेतले जाते. वयाच्या ५६व्या वर्षी देखील वर्षा उसगांवकर तितक्याच तरुण आणि उत्साही दिसतात. वर्ष उसगांवकर यांनी आपल्या घाऱ्या डोळ्यांनी, देखण्या चेहऱ्याने अवघ्या मनोरंजन विश्वावर राज्य केलं. अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी केवळ मराठी मनोरंजन विश्वच नाही, तर हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. आज (२८ फेब्रुवारी) अभिनेत्री वर्षा उसगांवकर आपला ५६वा वाढदिवस साजरा करत आहेत. चला तर याच निमित्ताने जाणून घेऊया काही खास गोष्टी...

वर्षा उसगांवकर यांचा जन्म गोव्यामधील उसगावमध्ये झाला. या गावाच्या नावावरूनच त्यांचं आडनाव उसगांवकर असं पडलं. वर्षा उसगांवकर यांचे वडील राजकारणात सक्रिय होते. परंतु, वर्ष यांना मात्र राजकारणात अजिबात रस नव्हता. आपण मोठं होऊन अभिनेत्री व्हायचं, हे त्यांनी अगदी लहानपणीच ठरवलं होतं. आपल्या ध्येयाच्या दिशेनेच त्यांनी वाटचाल करायला सुरुवात केली होती. त्यांना बालपणापासूनच नृत्य आणि गाण्याची प्रचंड आवड होती. मात्र, लाजऱ्या स्वभावाच्या वर्षा शाळेच्या कार्यक्रमांमध्ये क्वचितच सामील व्हायच्या.

Aanchal Tiwari: ‘पंचायत २’ फेम अभिनेत्री आंचल तिवारीचे अपघाती निधन; ४ कलाकारांनीही गमावले प्राण

असा मिळाला आत्मविश्वास!

लाजऱ्या स्वभावामुळेच त्यांनी शाळेमध्ये असताना कधी कुठल्या कार्यक्रमात भाग घेतला नाही. परंतु, नववीमध्ये असताना त्यांना स्टेजवर नृत्य कारावं वाटलं आणि त्यांनी ‘दिसला ग बाई दिसला’ या लावणीवर स्वतःच नाच बसवून तो सादर केला. त्यांच्या या नृत्य कौशल्याचं सर्वांनी कौतुक केलं आणि यामुळे त्यांच्या मनात स्वतःविषयी आत्मविश्वास निर्माण झाला. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांनी एकांकिका स्पर्धा, राज्यनाट्यस्पर्धा विविध स्पर्धांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. औरंगाबादमधून त्यांनी नाट्यशास्त्राचं शिक्षण देखील घेतलं.

प्रत्येक क्षेत्रात झोकून देऊन काम केलं!

अभिनयासोबतच वर्षा उसगांवकर यांना गाण्याचीही प्रचंड आवड होती. सुंदर चेहऱ्यासोबतच त्यांना गोड गळा देखील लाभला आहे. त्यांच्या गाण्याचे अनेक ठिकाणी कार्यक्रमही झाले आहे. तर, रसिक प्रेक्षकांनी त्यांच्या गाण्यांना दादही दिली आहे. गाण्याच्या आवडीमुळे त्यांनी गायनाचं शास्त्रशुद्ध शिक्षणही घेतलं. आपण जे काही करू त्यात पूर्णपणे झोकून द्यायचं हा वर्षा उसगांवकर यांचा स्वभाव होता. हेमा मालिनी यांची निर्मिती असणाऱ्या ‘राणी लक्ष्मीबाई’ या मालिकेत काम करण्यासाठी वर्षा घोडेस्वारी शिकल्या होत्या. या मालिकेमध्ये त्यांना घोड्यावर बसून काही सीन द्यावे लागणार होते. त्यासाठी हेमा मालिनी यांनी वर्षा उसगांवकर यांना घोडेस्वारी शिकायला लावली होती. त्या रोज पहाटे ५ वाजता उठून घोडेस्वारी शिकायला जायच्या. वर्षा उसगांवकर यांनी नेमबाजीचंही प्रशिक्षण घेतलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग