मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Janhvi Kapoor Birthday: जान्हवी कपूर आणि कार्तिक आर्यनच्या नात्यात ‘हा’ व्यक्ती ठरलेला व्हिलन! अधुरीच राहिली प्रेमकहाणी

Janhvi Kapoor Birthday: जान्हवी कपूर आणि कार्तिक आर्यनच्या नात्यात ‘हा’ व्यक्ती ठरलेला व्हिलन! अधुरीच राहिली प्रेमकहाणी

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 06, 2024 07:45 AM IST

Janhvi Kapoor Birthday Special: शिखर पहारियाच्या आधी जान्हवी कपूरने काही प्रसिद्ध लोकांना डेट केले होते. या यादीत बॉलिवूडचा ‘मोस्ट अवेटेड बॅचलर; कार्तिक आर्यनचे नाव देखील सामील आहे.

Janhvi Kapoor Birthday
Janhvi Kapoor Birthday (Instagram/spacemuffin27)

Janhvi Kapoor Birthday Special: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत असते. अभिनेत्री शिखर पहारियासोबत अनेक टिकाणी स्पॉट झाली आहे. आता तर ती प्रत्येक कार्यक्रमालासोबत शिखरला घेऊन जाताना दिसते, अभिनेत्री जान्हवी कपूर हिने ‘कॉफी विथ करण’मध्ये शिखरसोबतच्या तिच्या नात्याबद्दल चर्चाही केली होती. मंदिर असो, पार्टी असो किंवा कोणताही कार्यक्रम, जान्हवी बॉयफ्रेंड शिखरसोबत एकत्र दिसत आहे. पण, तुम्हाला माहित आहे का की शिखरच्या आधीही अभिनेत्रीने काही प्रसिद्ध लोकांना डेट केले होते. या यादीत बॉलिवूडचा ‘मोस्ट अवेटेड बॅचलर’ कार्तिक आर्यनचे नाव देखील सामील आहे. मात्र, त्यांच्या नात्यात बॉलिवूडचाच एक व्यक्ती व्हिलन ठरला.

शिखर पहारिया

जान्हवी कपूर आणि शिखर खूप वर्षांपासूनपासून एकमेकांना डेट करत होते. पण, काही कारणाने त्यांचा ब्रेकअप झाला होता आणि ते वेगळे झाले होते. मात्र, शिखर आणि जान्हवी आता पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. आता शिखर आणि जान्हवी यांच्यातील नाते आणखी घट्ट झाले आहे. आता शिखर पहारिया आता कपूर कुटुंबाचा खास सदस्य बनला आहे.

Rinku Rajguru Post : सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रिंकू राजगुरूने दिले स्पष्टीकरण; म्हणाली...

अक्षत रंजन

एक काळ असा होता की, जेव्हा जान्हवीने बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला नव्हता. यादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये जान्हवी आणि अक्षत रंजन एकत्र पोज देताना दिसत होते. दोघांच्या अफेअरची पुष्टी खुद्द करण जोहरने त्याच्या शोमध्ये केली होती. मात्र, नंतर दोघे वेगळे झाले.

ईशान खट्टर

जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांनी ‘धडक’ या चित्रपटातून एकत्र डेब्यू केला होता. हा चित्रपट मे २०१८मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दोघांनी प्रेमीयुगुलांची भूमिका केली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांना डेट करू लागल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, काही काळानंतर ईशानचे नाव अनन्या पांडेसोबत जोडले जाऊ लागले.

कार्तिक आर्यन

'दोस्ताना २'मध्ये करण जोहर कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूरला एकत्र कास्ट करत होता. या चित्रपटाचे फोटो सेशन देखील संपले होते. याचवेळी जान्हवी आणि कार्तिक गोव्यात एकत्र स्पॉट झाले होते. दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा जोरदार सुरू होत्या. पण, करण जोहर आणि कार्तिक आर्यन यांच्यात मतभेद होताच, त्याने चित्रपटातून काढता पाय घेतला. करण जोहरशी वाकडं झाल्यानंतर जान्हवी कपूरनेही कार्तिक आर्यनला दूर केले.

IPL_Entry_Point