मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jui Gadkari Cast: चाहत्याने जुई गडकरीला विचारली जात; अभिनेत्रीने दिलेले उत्तर ऐकून कराल कौतुक!

Jui Gadkari Cast: चाहत्याने जुई गडकरीला विचारली जात; अभिनेत्रीने दिलेले उत्तर ऐकून कराल कौतुक!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 05, 2024 12:51 PM IST

Fan Asked Jui Gadkari about cast: जुई गडकरी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांशी संवाद साधत असते.

Fan Asked Jui Gadkari about cast
Fan Asked Jui Gadkari about cast

Fan Asked Jui Gadkari about cast: छोट्या पडद्यावर ‘सायली’ बनून ‘ठरलं तर मग’मधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री जुई गडकरी सध्या प्रचंड चर्चेत आहे. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून जुई गडकरी हिने प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा मिळवली होती. मात्र, एका गंभीर आजारामुळे जुईला ती मालिका सोडावी लागली होती. आता या आजारावर मात करून ती पुन्हा छोट्या पडद्यावर परतली आहे. इतकंच नाही तर, तिने पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवला आहे. जुई गडकरी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांशी संवाद साधत असते. नुकतंच तिने सोशल मीडियावर ‘आस्क मी’ सेशन केलं. यावेळी तिला चाहत्याने जातीवरून प्रश्न विचारला.

जुई गडकरी नेहमीच चाहत्यांच्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं देताना दिसते. चाहत्यांशी गप्पा मारायला तिला खूप आवडतं. आता देखील तिने ‘आस्क मी’ सेशन घेतलं. यात तिने आपल्या चाहत्यांच्या सगळ्याच प्रश्नांना उत्तरे दिली. जुईने आपल्या अभिनयाने व निरागस सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. नुकत्याच तिने घेतलेल्या ‘आस्क मी’ सेशनमध्ये तिला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. यातच एका चाहत्याने तिला असा प्रश्न केला की, सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. या चाहत्याने जुईला ‘तुझी जात काय?’ असा प्रश्न केला. यावर जुई गडकरी हिने देखील त्याला रोखठोक उत्तर दिलं.

OTT Releases: ओटीटीवर होणार धमाका! ‘महारानी ३’ ते ‘हनुमान’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; पाहा यादी

जुईने दिले रोखठोक उत्तर

चाहत्याने जात विचारताच जुईने त्याला ‘मी भारतीय आहे’, असे उत्तर दिले. तिचे हे उत्तर वाचून आता नेटकरी कौतुक करत आहेत. जुई गडकरीच्या या उत्तराने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत. आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून नेहमीच चाहत्यांच्या चर्चेत असते. तर, कधी कधी चाहत्यांशी गप्पा मारून ती सगळ्यांचे मनोरंजन करते. जुई गडकरी ही चाहत्यांची खूप लाडकी आहे. अभिनेत्री जुई गडकरी हिने अतिशय मेहनतीने हे स्थान मिळवलं आहे. या प्रवासात तिच्यासमोर अनेक अडचणी आल्या. मात्र, तिने सगळ्यावर मात करत मेहनत केली. दररोज तीन तासांचा प्रवास करून ती कर्जतहून मालाडला कामासाठी यायची.

जुई गडकरी हिने आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. 'पुढचं पाऊल'मधून घराघरांत पोहोचलेली जुई गडकरी आता 'ठरलं तर मग' या मालिकेमधून सगळ्यांची लाडकी बनली.

WhatsApp channel