‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजचा भागात अभिराम आणि लीला हे त्यांचा ठरलेला लग्न सोहळा मोडताना दिसले आहेत. भर मेहंदी सोहळ्यात दुसऱ्याच मुलीच्या हातावर मेहंदी काढल्याने सगळ्यांनाच धक्का बसला होता. लीला जहागीरदार घराण्याची सून होऊ नये, यासाठी दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या नेहमीच प्रयत्न करत होत्या. मात्र, लीलाला स्वतःच हे लग्न करायचं नसल्याने, तिने देखील त्यांची साथ दिली. लीलाने मेहंदी सोहळ्यातून पळ काढला होता. दिल्या वचनाला लीला जागली नसल्यामुळे आता अभिराम देखील तिच्यावर चिडला आहे. साखरपुड्यातून पळून जाण्याच्या नादात लीलाने स्वतःचा जीव तर धोक्यात घातलाच होता. मात्र, यामुळे तिच्या कुटुंबाची देखील खूप बदनामी झाली.
लीलाला गुंडांच्या तावडीतून सोडवून निघालेला अभिराम आता घरी येऊन थेट लग्न मोडल्याचे म्हणतो. तर, आपल्याला लीलाशी लग्न करायचं नाही, असे देखील तो म्हणतो. दुसरीकडे अभिरामने आपल्या मुलीशी ठरलेलं लग्न मोडून, तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, असा आरोप कालिंदी त्याच्यावर करत आहे. ‘हे लग्न मोडल्यामुळे लीलाचं आयुष्य तर बरबाद झालं, मात्र माझ्या लहान मुलीचं आयुष्य देखील उद्ध्वस्त होईल. त्यामुळे तुम्ही याच्यात लक्ष घाला आणि अभिरामला हे लग्न करण्यासाठी तयार करा’, असं अशी विनवणी कालिंदी आजीकडे करताना दिसली. मात्र, लक्ष्मी, दुर्गा आणि सरस्वती यांनी मध्ये पडून कालिंदीला चांगलेच सुनावले. इतकंच नाही तर, त्यांनी कालिंदीचा अपमान देखील केला.
या अपमानाचा जाब विचारायला लीला थेट अभिरामकडेच गेली. तर, अभिरामने तिला हे लग्न तडकाफडकी मोडण्याचं कारण देखील सांगितलं. ‘तुला स्वतःलाच हे लग्न करायचं नव्हतं. पण, तू पळून जाताना या गोष्टीचा विचारच केला नाहीस की, तुझ्या अशा प्रकारे जाण्याने तुझ्या घरच्यांना किती बदनामी सहन करावी लागेल, मला माझी चूक आता कळतेय. एका अशा मुलीशी मी लग्न करायला जात होतो, जिला कशाचीही अक्कल नाही. त्यामुळे तुला ज्याप्रमाणे हवं होतं, मी हे लग्न मोडत आहे.’
या दरम्यान आता अभिराम आणि लीलाची बाचावाची होणार होणार आहे. तर, लीला देखील हे लग्न मोडलं, असं म्हणत तिथून काढता पाय घेणार आहे. कालिंदी मात्र अजूनही आपल्या हातातून श्रीमंत जावई निघून चालला याचं दुःख पचवू शकत नाहीये. ती अभिरामला मनवण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे. दुसरीकडे, आजी देखील हे लग्न मोडण्यामागचं खरं कारण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. मात्र, अंतराच्या फोटो समोर उभं करून देखील अभिराम काहीच बोलत नसल्याने, आता आजी देखील माघार घेणार आहे.