मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  श्रीनु-ओवीच्या प्रेमाला मिळणार का घरातल्यांची साथ? ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत येणार मोठं वळण!

श्रीनु-ओवीच्या प्रेमाला मिळणार का घरातल्यांची साथ? ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत येणार मोठं वळण!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 02, 2024 12:45 PM IST

ओवी ही संध्याची मुलगी असल्याने सतत तिचा दुस्वास केला गेला. मात्र आता श्रीनूने सगळ्या खोत कुटुंबासमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

श्रीनु-ओवीच्या प्रेमाला मिळणार का घरातल्यांची साथ? ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत येणार मोठं वळण!
श्रीनु-ओवीच्या प्रेमाला मिळणार का घरातल्यांची साथ? ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत येणार मोठं वळण!

'सारं काही तिच्यासाठी'मालिकेत नुकताच निशी-नीरजच्या लग्नाचा समारंभ पार पडला. आता लग्न सोहळा पार पडल्यानंतर थोड्याच दिवसात सचदेव कुटुंब निशाला घेऊन मुंबईला जाणार आहे. त्याआधी छाया, निशी,ओवी आणि बाकीच्या मैत्रिणींनी निशीसोबत छोटंसं गेट टुगेदर ठरवलं आहे. या छोटेखानी पार्टीतून निशी आणि ओवी परत येत असताना काही गुंड तिथे येऊन, त्या दोघींना अडवून पैसे आणि दागिने चोरण्याचा उद्देशाने निशीवर हल्ला करतात. यावेळी ते गुंड निशीच्या गळ्यातलं मंगळसुत्र खेचून घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ओवी या गुंडांशी दोन हात करते. ओवी या गुंडांना प्रतिकार करते आणि त्या झटापटीत ओवी गंभीररीत्या जखमी होते.

ट्रेंडिंग न्यूज

ओवी जखमी झालेली पाहून आता निशी हादरून गेली आहे. यावेळी ती घाबरून दादा खोतांना फोन करणार आहे. गंभीर जखमी झाल्यामुळे ओवीची परिस्थिती अतिशय नाजूक झाली आहे. ओवीची ही अवस्था पाहून घरातले सगळेच काळजीत पडले आहेत. निशीने दादांना घडला प्रकार सगळा सविस्तर सांगितला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला झाल्यांनतर ओवीवर लगेच उपचार झाले असते, तर तिला वाचवण्याची काहीतरी आशा होती. पण, तिला हॉस्पिटलला घेऊन येईपर्यंत खूप रक्त गेले आहे. याशिवाय ओवीला झालेल्या जखमा खोलवर आहेत. त्यामुळे आता ओवी वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत.

महेश कोठारेंची कमाल! मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार इन्स्पेक्टर महेश आणि लक्ष्याची धमाल! कशी? वाचाच...

श्रीनू देणार प्रेमाची कबुली!

ओवीचा जीव धोक्यात आल्याचे ऐकताच सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. तर, ओवीबद्दल हे ऐकून आता श्रीनू ओवीच्या रूममध्ये जाणार आहे. तो तिच्या जवळ बसून तिचा हात हातात घेऊन ओक्साबोक्सी रडायला लागणार आहे.यावेळी नेमके तिथे रघुनाथ उमा, दाईची आणि लाली येणार आहे. तर, यावेळी अजिबात न घाबरता श्रीनू सगळ्यांनसमोर त्याचं ओवीवर प्रेम असल्याची कबुली देणार आहे. हे ऐकून श्रीनूच्या आईला आणि दादा खोतांना मोठा धक्का बसणार आहे. आता खोत कुटुंब श्रीनूच्या प्रेमाला साथ देणार का?, हे मालिकेच्या येत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.

घरच्यांची साथ मिळणार का?

परदेशातून कोकणात राहायला आलेल्या ओवीला पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडलेला श्रीनू नेहमीच तिची काळजी घेताना दिसला होता. मात्र, खोतांच्या घरात सुरुवातीपासूनच ओवीला दुय्यम वागणूक मिळत होती. ओवी ही संध्याची मुलगी असल्याने सतत तिचा दुस्वास केला गेला. मात्र आता श्रीनूने सगळ्या खोत कुटुंबासमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे मालिकेच्या भागांमध्ये रंजक वळण पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग