मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कुणालच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चैतन्यसोबत सुभेदार कुटुंबही झालं सज्ज! ‘ठरलं तर मग’मध्ये रोमांचक वळण

कुणालच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चैतन्यसोबत सुभेदार कुटुंबही झालं सज्ज! ‘ठरलं तर मग’मध्ये रोमांचक वळण

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 02, 2024 03:12 PM IST

चैतन्यला कुणाल आणि साक्षीचे एकत्र फोटो, त्यांची प्रेमपत्र बघून प्रचंड मोठा धक्का बसला आहे. आता मालिकेत सुभेदार कुटुंब कुणालच्या मृत्यूचा बदला घेताना दिसणार आहे.

कुणालच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चैतन्यसोबत सुभेदार कुटुंबही झालं सज्ज! ‘ठरलं तर मग’मध्ये रोमांचक वळण
कुणालच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चैतन्यसोबत सुभेदार कुटुंबही झालं सज्ज! ‘ठरलं तर मग’मध्ये रोमांचक वळण

ठरलं तर मग’च्या आजच्या भागात सायलीच्या हाती साक्षी विरोधातील सगळे पुरावे लागलेले पाहायला मिळणार आहेत. सायलीच्या हातात सगळे पुरावे तर आले आहेत, मात्र आता बाहेर कसं पडायचं हा मोठा प्रश्न आहे. साक्षी खाली आली असली, तरी तिचं लक्ष आपल्या खोलीच्या दरवाज्याकडे लागून राहिलेलं आहे. जर, सायली वरच्या बाजूने खाली आली तर, साक्षीचा संशय आणखी बळावेल, हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे काहीही झालं तरी, सायलीने घराच्या मुख्य दरवाज्यातूनच आतमध्ये येणं गरजेचं होतं. त्यासाठी आता सायली वरच्या रूममधील खिडकीतून खाली उतरून मुख्य दरवाजातून घरात येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दुसरीकडे अंगठी घालायची वेळ आली तरी सायली कशी नाही आली? अशी विचारणा साक्षी करणार आहे. सायली परत न आल्यामुळे सगळे चिंतेत पडले होते. मात्र, अंगठ्या घालायचा क्षण येणार इतक्यात सायली तिकडे हजर होणार आहे. तिला पाहून अश्विन आनंदानेच किंचाळणार आहे. सायलीला दरवाजातून आलेलं पाहून साक्षीला थोडं हायसं वाटलं. मात्र, तिने सायलीला विचारलं की, तू तर गिफ्ट आणायला गेली होतीस? मग, कुठे आहे गिफ्ट? यावर उत्तर देताना सायली म्हणाली की, ‘मी गिफ्ट घेऊन आले नाहीये. इतक्या मोठ्या लोकांचं लग्न आहे, मग छोटसं गिफ्ट देऊन कसं चालेल? म्हणून एक भलं मोठं गिफ्ट तयार करून आले आहे.’

Salman Khan: सलमान खानने ‘हीरामंडी’ सीरिजमधील ‘या’ अभिनेत्रीला केला होता लग्नासाठी प्रपोज! ती नाही म्हणली अन्...

साक्षीचा संशय बळावणार!

दुसरीकडे सगळे सुभेदार मस्करीत हसतात. यानंतर गुरुजी अंगठी घालण्याचा कार्यक्रम करायला सांगतात. त्यावेळी काहीतरी कारण सांगून पूर्णा आजी चैतन्याच्या कपड्यांवर ज्यूस ओतते आणि हीच संधी साधून कल्पना त्याला कपडे बदलण्यासाठी त्याच्या रूममध्ये घेऊन जाते. तर, कल्पनाला अर्जुन म्हणतो की, ‘आई तू राहू दे मी जातो. सायली तुम्ही पण चला.’ यावर साक्षी म्हणते की, ‘मुलांच्या रूममध्ये मुलीचं काय काम? सायली तिथे जाऊन काय करणार?’ तर, अर्जुन म्हणतो ‘सॉरी मी चुकून सायलीचं नाव घेतलं. आम्ही दोघे वर जाऊन येतो.’

चैतन्यला कळणार सगळ्या गोष्टी!

मात्र, हळूच सायली देखील तिथून काढता पाय घेते. अर्जुन चैतन्यला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो आणि त्याला पुन्हा एकदा साक्षीशी साखरपुडा करू नको, ही गोष्ट समजवायला लागतो. त्यावेळी भडकलेला चैतन्य अर्जुनला म्हणतो, की ‘मला वाटलंच होतं. तू इथे माझ्या आनंदात सहभागी व्हायला आलेला नाहीस. तू पुन्हा एकदा काहीतरी नवीन तमाशा करणार आहेस.’ यानंतर, सायली आणि अर्जुन सगळे पुरावे चैतन्य समोर सादर करतात. चैतन्यला कुणाल आणि साक्षीचे एकत्र फोटो, त्यांची प्रेमपत्र बघून प्रचंड मोठा धक्का बसला आहे. आता मालिकेत सुभेदार कुटुंब कुणालच्या आत्महत्येचा बदला घेताना दिसणार आहे.

IPL_Entry_Point