मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ये राम तो रॅम्बो निकला रे! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये अभिरामचा डॅशिंग अंदाज पाहून लीलाही हैराण!

ये राम तो रॅम्बो निकला रे! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये अभिरामचा डॅशिंग अंदाज पाहून लीलाही हैराण!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 01, 2024 04:32 PM IST

अभिरामने दरवाजा उघडून गुंडांशी हाणामारी केली आणि लीलाला वाचवलं. अभिरामचा हा डॅशिंग धडाकेबाज अंदाज पाहून लीला देखील हैराण झाली होती.

ये राम तो रॅम्बो निकला रे! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये अभिरामचा डॅशिंग अंदाज पाहून लीलाही हैराण!
ये राम तो रॅम्बो निकला रे! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये अभिरामचा डॅशिंग अंदाज पाहून लीलाही हैराण!

नवरी मिळे हिटलरला' या मालिकेच्या आजच्या भागात अभिराम लीलाला शोधून आणताना दिसणार आहे. अभिरामने लीलाला शोधून तर काढलं होतं. मात्र, ती स्वतःच मेहंदी सोहळ्यातून पळून गेली, हे लक्षात आल्यानंतर अभिराम संतापला आहे. मात्र, त्याने आपला राग लपवत त्यावेळी लीलाला गुंडांच्या तावडीतून सोडवणं अधिक योग्य समजलं. गुंडांच्या भीतीने लीलाने अभिरामला खेचून एका रूममध्ये लॉक केलं होतं. मात्र, या गुंडांनी दरवाजा ठोकू लागताच लीलाची घाबरगुंडी उडाली होती. तर, अभिरामने दरवाजा उघडून गुंडांशी हाणामारी केली आणि लीलाला वाचवलं. अभिरामचा हा डॅशिंग धडाकेबाज अंदाज पाहून लीला देखील हैराण झाली होती.

ट्रेंडिंग न्यूज

मात्र, लीलाने आपल्याला हे लग्न करायचं नाही, असं देखील अभिरामला सांगितलं आहे. परंतु, ‘हे लग्न ठरलेलं आहे आणि ठरल्याप्रमाणेच होईल! मोडणार नाही त्यामुळे मेहंदी सोहळ्याला लगेच चल’, असं म्हणत अभिरामने लीलाचा हात धरला आणि तिला खेचतच बाहेर नेलं. पण, ‘मला हे लग्न करायचं नाही, प्लीज मला जाऊ द्या. मी स्वतःच्या मर्जीन पळून आले होते. तुम्हाला वाटलं असेल की, या गुंडांनी मला किडनॅप केलं. पण, तसं अजिबात नाहीये. मी स्वतः त्यांच्या गाडीत जाऊन बसले होते. आता तरी समजा की, मला तुमच्याशी लग्न नाही करायचं. जर मी हे लग्न केलं, तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल’, असं म्हणून लीला त्याला समजावण्याचा प्रयत्न करते.

सायलीच्या हाती पुरावे लागणार तर साक्षीलाही संशय येणार! ‘ठरलं तर मग’ मालिका रंजक वळणावर

मेहंदी सोहळा होणारच!

मात्र, अभिराम तिला घरी घेऊनच जातो. दुसरीकडे, हा मेहंदी सोहळा संपला, आता प्रत्येकाने आपापल्या घरी जा, असं म्हणत अभिरामच्या सुनांनी सगळ्यांनाच घराबाहेर काढले आहे. एकीकडे ते लोक मेहंदी सोहळा संपला आहे, हे जाहीर करणार इतक्यातच अभिराम तिथे पोहोचणार आहे. ‘हा सोहळा संपलेला नसून, मेहंदी सोहळा पूर्ण होणारच’, असं म्हणत अभिराम पुढची तयारी करायला सांगतो. लीला कशी आणि कुठे भेटली, हे तो कुणालाही सांगत नाही.

अभिराम देणार सगळ्यांना धक्का!

आता पहिला हा मेहंदी सोहळा पूर्ण करून घेऊ असं म्हणत अभिराम तयारीला लागायला सांगतो. इतक्यात आजी अभिरामच्या हातात मेहंदीचा कोन देऊन, तू तुझ्या बायकोच्या हातावर तुझं नाव रेखाट, असं म्हणते. यावेळी आता प्रेक्षकांना एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अभिराम मेहंदीचा कोन तर हातात घेतो, मात्र ती मेहंदी लीलाच्या हातावर न काढता तिच्या बाजूला उभ्या असणाऱ्या श्वेताच्या हातावर काढतो. हे पाहून आता आजीसह लीलाच्या कुटुंबाला देखील धक्का बसणार आहे. अभिरामने असं का केलं? याचं कारण कुणालाही माहित नाही. मालिकेच्या येत्या भागात हे रंजक वळण पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point