मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Movies Releasing This Week: बॉक्स ऑफिसवर हिंदी-मराठी चित्रपटांचा होणार सामना; पाहा या आठवड्यात कोणते चित्रपट रिलीज होणार

Movies Releasing This Week: बॉक्स ऑफिसवर हिंदी-मराठी चित्रपटांचा होणार सामना; पाहा या आठवड्यात कोणते चित्रपट रिलीज होणार

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 25, 2023 07:28 PM IST

Movies Releasing This Week: एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा बहुप्रतीक्षित हिंदी आणि मराठी चित्रपटांचा सामना पाहायला मिळणार आहे.

Movies Releasing This Week
Movies Releasing This Week

Movies Releasing This Week: कोरोनानंतर आता मनोरंजन विश्व पुन्हा एकदा पूर्वपदावर येऊ लागलं आहे. एकीकडे बॉलिवूडचे बिग बजेट चित्रपट आता रिलीज होत आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा बहुप्रतीक्षित हिंदी आणि मराठी चित्रपटांचा सामना पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात काही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित हिंदी मराठी चित्रपट रिलीज होणार आहेत. तुम्ही देखील विकेंडला चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर हे वाचाच...

ट्रेंडिंग न्यूज

महाराष्ट्र शाहीर

शाहीर साबळे यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान होते. लोककलेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्र आणि राज्याभिमान जागविण्याचे काम केले. या कार्याच्या माध्यामतून ते अनेक जाज्ज्वल्य प्रतिभा असलेल्या मान्यवरांच्या सानिध्यात आले. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या निमित्ताने यातील काही व्यक्तिमत्त्वे रुपेरी पडद्यावर अवतरणार आहेत. २८ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Meenakshi Seshadri : जॅकी श्रॉफ पडला होता मीनाक्षी शेषाद्रीच्या प्रेमात; ‘या’मुळे झाला होता ब्रेकअप!

टीडीएम

'ख्वाडा' आणि 'बबन' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर एक आगळावेगळा विषय भाऊराव कऱ्हाडे या चित्रपटातून मांडण्यास सज्ज झाले आहेत. अॅक्शन रोमान्सचा भरणा असलेला हा चित्रपट गावाकडच्या मातीतला असून, प्रेक्षकांच्या दिलावर राज्य करतोय. २८ एप्रिल २०२३ला हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. 'टीडीएम' चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली आहे.

द साँग ऑफ स्कॉर्पिअन

‘द साँग ऑफ स्कॉर्पिअन’ या चित्रपटामुळे अभिनेता इरफान खान याला अखेरचं मोठ्या स्क्रीनवर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्याचा हा शेवटचा चित्रपट 'द साँग ऑफ स्कॉर्पिअन’ २८ एप्रिलला रिलीज होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती झीशान अहमद यांनी केली आहे. ‘द साँग ऑफ स्कॉर्पिअन’ या चित्रपटात इरफानने एका उंट व्यापाऱ्याची भूमिका केली आहे. इरफानने साकारलेला हा व्यापारी नूरन नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. नूरन एक स्वतंत्र मुलगी आहे आणि तिची आजी झुबेदा यांच्याकडून ‘साँग ऑफ स्कॉर्पिअन’ ही प्राचीन उपचार कला शिकत आहे. एका प्रचलित दंतकथेनुसार, जर एखाद्या विंचूने एखाद्याला दंश केला, तर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. परंतु, या साँग ऑफ स्कॉर्पिअन गाऊन गायक त्या व्यक्तीला बरे करू शकतो.

बॅड बॉय

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. तो लवकरच 'बॅड बॉय' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात नमाशी एका अतिशय हुशार अशा मुलीच्या प्रेमात पडतो. त्याला त्या मुलीशी लग्न करायचे असेत. मात्र, नमाशीकडे नोकरी नसते. त्यामुळे त्या मुलीचे वडील लग्नास नकार देतात. पुढे काय काय घडतं, हे यात पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point