मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shah Rukh Khan: बॉलिवूड किंग शाहरुख खानने ‘या’ मॉडेलसाठी स्वतःच्या हाताने बनवला पिझ्झा! पोस्ट होतेय व्हायरल...

Shah Rukh Khan: बॉलिवूड किंग शाहरुख खानने ‘या’ मॉडेलसाठी स्वतःच्या हाताने बनवला पिझ्झा! पोस्ट होतेय व्हायरल...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 24, 2023 06:58 PM IST

Shah Rukh Khan Makes Pizza For Model: नवप्रीत कौरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती शाहरुख खानसोबत दिसत आहे.

Shah Rukh Khan Makes Pizza For Model
Shah Rukh Khan Makes Pizza For Model

Shah Rukh Khan Makes Pizza For Model: बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानची जगभरात फॅन फॉलोइंगही आहे. एक चांगला अभिनेता असण्यासोबतच शाहरुख एक उत्तम व्यक्ती आणि होस्ट देखील आहे. शाहरुख अनेकदा त्याच्या जवळच्या लोकांना त्याच्या घरी अर्थात ‘मन्नत’ला बोलावतो आणि त्यांचे आदरातिथ्यही करतो. नुकतेच शाहरुख खानने ‘फेमिना मिस इंडिया’ फेम नवप्रीत कौरला ‘मन्नत’वर बोलावले होते. शाहरुख खानने नवप्रीतला केवळ घरीच बोलावले नाही, तर स्वतः तिचे आदरातिथ्य केले. एक पोस्ट शेअर करून नवप्रीतने शाहरुख खानचे तोंडभरून कौतुक केले आहे.

नवप्रीत कौरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती शाहरुख खानसोबत दिसत आहे. नवप्रीतने या फोटोंसोबत एक लांबलचक कॅप्शन लिहून ‘मन्नत’मध्ये आपली कशी काळजी घेतली गेली हे सांगितले आहे. नवप्रीतने लिहिले की, ‘मी स्वतःला हे पोस्ट न करण्याचे वचन दिले होते. परंतु, ही आठवण खूप मौल्यवान आहे, जी मी केवळ स्वतःजवळ ठेवू शकत नाही. मन्नत येथे घालवलेल्या या माझ्या आयुष्यातील खास दिवसासाठी मी स्वतःला धन्य समजते. किंग शाहरुख खानने स्वतःच्या हातांनी माझ्यासाठी पिझ्झा बनवला होता.’

Viral Video: विराट अन् अनुष्कानं जिममध्येच धरला ठेका; मात्र व्हिडीओचा शेवट पाहून चाहते चिंतेत!

नवप्रीतने पुढे लिहिले की, ‘शाहरुख खानचे संपूर्ण कुटुंब आणि मॅनेजर पूजा ददलानी यांच्यासोबत जेवणाच्या टेबलावर वेळ घालवताना मला खूप आनंद झाला. सुरुवातीला मला हे सगळं स्वप्नवत वाटलं. पण, शाहरुखने ज्याप्रकारे माझे आदरातिथ्य केले, त्याने मी भारावून गेले आहे. गौरी मॅडम खूप गोड आहेत. अबराम माझा नवा चांगला मित्र आहे, आर्यन देखील खूप छान आहे. तर, सुहाना डान्समध्ये माहिर आहे. यानंतर शाहरुख खान मला घराबाहेर कॅबपर्यंत सोडायला आले होते. कॅब ड्रायव्हरने त्यांना पाहिल्यानंतर सेल्फी घेण्याची संधी सोडली नाही. हा दिवस खरोखरच अप्रतिम होता.’

नवप्रीत कौर एक लोकप्रिय मॉडेल आहे. ती फेमिना मिस इंडिया २०१७ मधील टॉप ५ स्पर्धकांपैकी एक आहे. तिला बालपणात टीव्हीवर फॅशन शो आणि सौंदर्य स्पर्धा पाहून मॉडेल बनण्याची प्रेरणा मिळाली. फेमिना मिस इंडिया २०१७ स्पर्धेत तिने पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले, तेव्हा नवप्रीत प्रकाशझोतात आली होती.

IPL_Entry_Point