मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Meenakshi Seshadri : जॅकी श्रॉफ पडला होता मीनाक्षी शेषाद्रीच्या प्रेमात; ‘या’मुळे झाला होता ब्रेकअप!

Meenakshi Seshadri : जॅकी श्रॉफ पडला होता मीनाक्षी शेषाद्रीच्या प्रेमात; ‘या’मुळे झाला होता ब्रेकअप!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 25, 2023 06:47 PM IST

Meenakshi Seshadri Love Story: ‘हीरो’ या चित्रपटात जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्री मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटादरम्यान दोघांचे अफेअरही सुरू झाले होते.

Meenakshi Seshadri and Jackie Shroff
Meenakshi Seshadri and Jackie Shroff

Meenakshi Seshadri Love Story: बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ जवळपास गेल्या तीन दशकांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. या अभिनेत्याने आपल्या करिअरची सुरुवात 'हीरो' या चित्रपटातून केली होती, ज्यामध्ये तो मीनाक्षी शेषाद्रीसोबत मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटानंतर प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावरची ही नवी जोडी खूपच आवडली होती. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटादरम्यान दोघांचे अफेअरही सुरू झाले होते. परंतु, त्यावेळी या चित्रपटाच्या टीममधील कोणालाही याची माहिती नव्हती.

जॅकी श्रॉफने त्याच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगने केली होती. पण, त्याला मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आणि त्याच्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. त्यानंतर सर्वजण जॅकीसोबत काम करण्यास उत्सुक होते. जॅकी श्रॉफच्या या चित्रपटातून मीनाक्षी शेषाद्रीही रातोरात स्टार बनली होती. या चित्रपटाच्या यशानंतर दोघांचे अफेअरही सुरू झाले. पण, दोघांनीही याची कुणकुण कुणालाच लागू दिली नाही.

Aryan Khan: आर्यन बनला ‘पापा’ शाहरुख खानचा दिग्दर्शक; टीझरने वाढवली प्रेक्षकांची उस्तुकता!

मात्र, या चित्रपटानंतर मीनाक्षीला एकाच वेळी अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. भरपूर कामात व्यस्त असल्याने हळूहळू ती जॅकीपासून दूर जाऊ लागली. त्यानंतर दोघांची ही प्रेमकथा पुढे जाऊच शकली नाही आणि त्याचवेळी दोघांचे मार्ग वेगळे झाले.

यानंतर ९०च्या दशकात दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हिला 'घायल' चित्रपटाची ऑफर दिली. या चित्रपटादरम्यान दिग्दर्शक राजकुमार संतोषीही तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडले आणि त्यांनी अभिनेत्रीला प्रपोज केला. मात्र, अभिनेत्रीने त्याचा प्रस्ताव थेट धुडकावून लावला. मीनाक्षीने आपल्या कारकिर्दीत हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत आणि प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम केले आहे. सध्या ती इंडस्ट्रीपासून दूर आनंदी जीवन जगत आहे. काही काळापूर्वी ही अभिनेत्री गाण्याचा रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल'मध्येही दिसली होती.

IPL_Entry_Point

विभाग