मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Farah Khan Ali: सुझैन खानच्या बहिणीला पाहिलं का? घटस्फोटानंतर शेअर केले बिकिनी फोटो!

Farah Khan Ali: सुझैन खानच्या बहिणीला पाहिलं का? घटस्फोटानंतर शेअर केले बिकिनी फोटो!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 25, 2023 06:19 PM IST

Farah Khan Ali Bold Photos: काही महिन्यांपूर्वीच फराह खान अली हिने पती डीजे अकील याच्यापासून घटस्फोट घेतला होता. यामुळे ती प्रचंड चर्चेत आली होती.

Farah Khan Ali
Farah Khan Ali

Farah Khan Ali Bold Photos: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याची माझी पत्नी सुझैन खान सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. हृतिक रोशनपासून घटस्फोट घेतल्यानंतर आता सुझैन अर्सलान गोनी याला डेट करत आहे. यादरम्यान आता सुझैन खान हिची बहीण फराह खान अली देखील प्रचंड चर्चेत आली आहे. सुझैन खानची बहीण फराह अली खान ही ज्वेलरी डिझायनर असून, बॉलिवूडमध्ये तिचे देखील मोठे नाव आहे, नुकतेच फराह खान अली हिने सोशल मीडियावर तिचे बिकिनीतील काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

काही महिन्यांपूर्वीच फराह खान अली हिने पती डीजे अकील याच्यापासून घटस्फोट घेतला होता. यामुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. तर, आता घटस्फोट घेतल्यानंतर तिने सोशल मीडियावर बीचवर धमाल करतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने बिकिनी परिधान केली आहे. तिच्या या फोटोंवर चाहते आणि कलाकार कमेंट्स करत आहेत. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

फराह अली खान हिने गेल्यावर्षीच आपण घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली होती. त्यांनी घटस्फोट घेण्याच्या फराहच्या निर्णयाला तिचे मित्र आणि कुटुंबीयांनी पाठिंबा दिला होता. फराह आणि अकीलने २० फेब्रुवारी १९९९ रोजी लग्नगाठ बांधली होती. फराह आणि अकील दोन मुलांचे पालक देखील आहेत. त्यांच्या मुलांची नाव अजान आणि फिजा अशी आहेत. आता घटस्फोट घेल्यानंतर आता दोन्ही मुलं फराहसोबत राहत आहेत, तर, पालक म्हणून डीजे अकील आणि फराह नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेताना दिसतात.

IPL_Entry_Point

विभाग