मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Hrithik Roshan: बॉलिवूड चित्रपटांना साऊथचा तडका! हृतिक रोशनच्या ‘वॉर २’मध्ये ज्युनियर एनटीआरची एन्ट्री

Hrithik Roshan: बॉलिवूड चित्रपटांना साऊथचा तडका! हृतिक रोशनच्या ‘वॉर २’मध्ये ज्युनियर एनटीआरची एन्ट्री

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 05, 2023 03:09 PM IST

Hrithik Roshan War 2 New Update: हृतिक रोशनच्या ‘वॉर २’मध्ये देखील साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआरची एन्ट्री झाली आहे. या चित्रपटात हृतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि ज्युनियर एनटीआर यांची लढत पाहायला मिळणार आहे.

Hrithik Roshan War 2
Hrithik Roshan War 2

Hrithik Roshan War 2 New Update: सध्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये साऊथचा तडका पाहायला मिळत आहे. नुकतंच सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातील एका गाण्यात ‘आरआरआर’ स्टार रामचरणची एंट्री झाली. तर, दुसरीकडे शाहरुख खानच्या आगामी 'जवान' या चित्रपटात विजय सेतुपतीची एंट्री झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याच वेळी आता हृतिक रोशनच्या ‘वॉर २’मध्ये देखील साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआरची एन्ट्री झाली आहे. या चित्रपटात हृतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि ज्युनियर एनटीआर यांची लढत पाहायला मिळणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘वॉर 2’ हा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील सहावा भाग आहे. या चित्रपटाची कथा सलमान खानच्या ‘टायगर 3’शी जोडली जाण्याची शक्यता आहे. तर, हा चित्रपट २०२३च्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे म्हटले जात आहे. रुपेरी पडद्यावर साऊथ आणि बॉलिवूडची ही टक्कर पाहण्यासारखी असणार आहे. आता या दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक झाले आहेत.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन अभिनित ‘वॉर’ हा चित्रपट २०१९मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटामध्ये टायगर श्रॉफ देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात हृतिक रोशन ‘कबीर’ नावाच्या एका रॉ एजंटच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग पाहण्यासाठी चाहते देखील खूप उत्सुक आहेत. आता या चित्रपटात ज्युनियर एनटीआरची एन्ट्री झाल्याने साऊथचे चाहतेही हा चित्रपट पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

‘वॉर २’ या सीक्वलच्या दिग्दर्शनाची जबाबदारी यावेळी ‘ब्रह्मास्त्र’ फेम अयान मुखर्जीवर सोपवण्यात आली आहे. तर, ‘आरआरआर’ फेम ज्युनियर एनटीआरची चित्रपटात एन्ट्री झाल्याने आता हा चित्रपट नक्कीच गाजणार आहे. ज्युनियर एनटीआरची क्रेझ केवळ साऊथ पुरतीच मर्यादित नाही, तर ती जगभर पसरली आहे. ज्युनियर एनटीआरच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाने ऑस्करपर्यंत मजल मारली. त्यामुळे त्याच्या फॅन फॉलोविंगमध्येही मोठी वाढ झाली आहे. याचा फायदा टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ या चित्रपटाला नक्कीच होऊ शकतो. मात्र, अद्याप चित्रपटाच्या टीमकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

IPL_Entry_Point