मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  RRR: ऑस्कर सोहळ्यात एन्ट्रीसाठी ‘आरआरआर’च्या टीमला द्यावे लागले होते पैसे! तिकीटाची किंमत ऐकलीत का?

RRR: ऑस्कर सोहळ्यात एन्ट्रीसाठी ‘आरआरआर’च्या टीमला द्यावे लागले होते पैसे! तिकीटाची किंमत ऐकलीत का?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 19, 2023 11:31 AM IST

Oscar entry ticket price: क्रू मेंबर्ससह ऑस्कर सोहळ्यात सामील होण्यासाठी एसएस राजामौली यांना तिकिटे खरेदी करावी लागली होती.

RRR Team
RRR Team

Oscar entry ticket price: एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' या चित्रपटाने जगभरात आपल्या यशाचा झेंडा फडकवला आहे. यंदा पार पडलेल्या ९५व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात ‘आरआरआर’ चित्रपटाच्या 'नाटू नाटू' या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार जिंकला. या चित्रपटाला मिळालेल्या पुरस्कारामुळे देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. 'नाटू नाटू'ने ऑस्कर अवॉर्ड जिंकून इतिहास रचला. पण, या पुरस्कार सोहळ्यात आमंत्रण असूनही, गाण्याच्या कलाकाराला आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकाला ऑस्करमध्ये सहभागी होण्यासाठी मोफत तिकीट देण्यात आले नव्हते.

ऑस्करच्या मुख्य कार्यक्रमात 'नाटू नाटू'चे गीतकार चंद्र बोस, संगीतकार कीरावानी, एसएस राजामौली आणि त्यांचे कुटुंब, राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि त्याची पत्नी सहभागी झाली होती. एसएस राजामौली, ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मोफत तिकिटे देण्यात आली नव्हती. केवळ चंद्र बोस, एमएम कीरावानी आणि त्यांच्या पत्नींना ऑस्करसाठी विनामूल्य प्रवेश देण्यात आला होता.

तर, स्वत: एसएस राजामौली यांना ऑस्करमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या क्रू मेंबर्ससाठी तिकिटे खरेदी करावी लागली होती. ऑस्कर सोहळ्यात आपल्या टीमला हक्काची जागा मिळावी यासाठी लागलेला खर्च स्वतः राजामौली यांनी उचलला. ऑस्कर अवॉर्ड पाहण्यासाठी राजामौली यांना २५ हजार डॉलर्स म्हणजे प्रति व्यक्ती सुमारे २० लाख रुपये मोजावे लागले होते.

ऑस्करच्या नियमांनुसार, पुरस्कार विजेते आणि त्यांच्या कुटुंबियांना या मुख्य कार्यक्रमाची विनामूल्य तिकिटे दिली जातात आणि त्यांच्यासाठी प्रवेश विनामूल्य असतो. या पुरस्कार सोहळ्यामध्ये एसएस राजामौली आणि त्यांच्या टीमला शेवटच्या रांगेतील जागा दिल्याबद्दल अकादमीवर टीकाही झाली होती. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी नाराजीही व्यक्त करण्यात आली होती.

IPL_Entry_Point

विभाग