मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shiv Thakare: शिव ठाकरे पुन्हा प्रेमात पडलाय? ‘या’ अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय नाव!

Shiv Thakare: शिव ठाकरे पुन्हा प्रेमात पडलाय? ‘या’ अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय नाव!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 25, 2023 02:32 PM IST

Shiv Thakare Relationship : शिव ठाकरे एका प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. मात्र, या अभिनेत्रीने आता स्वतः यावर स्पष्टीकरण दिले आहे.

Shiv Thakare
Shiv Thakare

Shiv Thakare Relationship :बिग बॉस १६’ या रिअ‍ॅलिटी शोचा उपविजेता शिव ठाकरे देखील त्याच्या आगामी रिअॅलिटी शोमुळे सध्या चर्चेत आहे. शिव ठाकरे लवकरच रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी १६' या शोमध्ये दिसणार आहे. त्याचवेळी, त्याचं वैयक्तिक आयुष्य प्रचंड चर्चेत आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिव ठाकरे पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे म्हटले जात आहे. ‘बिग बॉस’च्या या मोस्ट एलिजिबल बॅचलरने गर्लफ्रेंड निवडली आहे. तो एका प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. मात्र, या अभिनेत्रीने आता स्वतः यावर स्पष्टीकरण दिले आहे.

अभिनेता शिव ठाकरे याने बिग बॉसच्या घरात असताना अनेकवेळा म्हटले होते की, तो अविवाहित आहे आणि सध्या त्याच्या आयुष्यात येणाऱ्या खास व्यक्तीची वाट पाहत आहे. त्यामुळेच त्याच्या लव्ह लाईफबद्दल चाहत्यांना खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या शिव ठाकरे टीव्ही अभिनेत्री आकांक्षा पुरीला डेट करत असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. दोघंही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यामुळे त्याच्या डेटिंगच्या चर्चांना हवा मिळाली आहे.

KKBKKJ: काय म्हणता! सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ ओटीटीवर रिलीज होणार? जाणून घ्या...

मात्र, आत अभिनेत्री आकांक्षा पुरी हिने शिवला डेट करण्याच्या बातम्यांवर नुकतेच आपले स्पष्टीकरण दिले आहे. तिने आपल्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत डेटिंगच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना आकांक्षा हिने म्हटले की, अशा बातम्यांवर मला हसू येते. तिने म्हटले की, 'या डेटींगच्या बातम्यांमध्ये अजिबात तथ्य नाहीये. शिव चांगला खेळ खेळतो. तो एक सुंदर माणूस आहे. पण दुर्दैवाने मला चांगली मुले मिळत नाहीत.’

या आधी शिव ठाकरे अभिनेत्री वीणा जगताप हिच्या प्रेमात होता. मात्र, त्यांचा ब्रेकअप झाला. एकापाठोपाठ एक असे तीन रिअॅलिटी शो केल्यानंतर आता पुन्हा एकदा शिव ठाकरे स्टंटवर आधारित शो ‘खतरों के खिलाडी’च्या नव्या सीझनमध्ये दिणार आहे. शिवने देखील याचा खुलासा केला आहे की, तो रोहित शेट्टीच्या शोमध्ये झळकणार आहे. त्याला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.

IPL_Entry_Point

विभाग