मराठी बातम्या  /  Entertainment  /  Bigg Boss 16 Contestant Shiv Thakare Got Big Opportunity With Salman Khan

Shiv Thakare : ‘बिग बॉस १६’मुळे शिव ठाकरेला लागली मोठी लॉटरी; सलमान खानसोबत झळकणार!

Shiv Thakare
Shiv Thakare
Harshada Bhirvandekar • HT Marathi
Feb 20, 2023 06:03 PM IST

Bigg Boss 16 Contestant Shiv Thakare : ‘बिग बॉस १६’ या रिअॅलिटी शोनंतर 'खतरों के खिलाडी' आणि 'लॉक अप २'साठी शिवला विचारणा झाली आहे. इतकंच नाही, तर आता एक मोठा चित्रपट देखील त्याच्या हाती आला आहे.

Bigg Boss 16 Contestant Shiv Thakare : बिग बॉस १६च्या माध्यमातून लोकांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण करणारा शिव ठाकरे शो संपल्यानंतरही चर्चेत आहे. त्याच्याबद्दल रोज काही ना काही अपडेट समोर येत असतात. सलमान खानच्या ‘बिग बॉस १६’ या रिअॅलिटी शोनंतर 'खतरों के खिलाडी' आणि 'लॉक अप २'साठी शिवला विचारणा झाली आहे. इतकंच नाही, तर आता एक मोठा चित्रपट देखील त्याच्या हाती आला आहे. लवकरच शिव ठाकरे सलमान खानसोबत झळकणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रोहित शेट्टीने शिव ठाकरे याला 'खतरों के खिलाडी'मध्ये कास्ट केल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. बिग बॉसच्या ग्रँड फिनाले आधी या रोहित शेट्टीने स्पर्धकांचे ऑडिशन घेतले होते, असे म्हटले जाते. आता स्वतः शिव ठाकरे याने देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शिव ठाकरे याने त्याच्या चाहत्यांसाठी नुकतंच एक सोशल मीडिया लाईव्ह सेशन केलं. यात त्याने चाहत्यांशी संवाद साधला.

या लाईव्ह सेशन शिव ठाकरे याने 'खतरों के खिलाडी' करण्याबाबत पुष्टी दिली. यासोबतच त्याने चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शिव ठाकरे याने लाईव्ह सेशनमध्ये चाहत्यांना सांगितले की, त्याला सलमान खानच्या एका चित्रपटाची ऑफर देण्यात आली आहे. मात्र, हा कोणता प्रोजेक्ट आहे, याची माहिती त्याने दिलेली नाही. मात्र, हे ऐकून चाहते खूप खूश झाले आहेत. चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

शिव ठाकरे हा प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि कोरिओग्राफर देखील आहे. त्याचा जन्म अमरावती येथे १९८९ साली झाला. ‘एमटीव्ही रोडीज रायझिंग’मधून तो पहिल्यांदा टीव्हीवर झळकला होता. तर, ‘बिग बॉस हिंदी’मध्ये येण्यापूर्वी तो ‘बिग बॉस मराठी’मध्येही दिसला होता. ‘मराठी बिग बॉस’ या शोच्या दुसऱ्या सीझनचा तो विजेता ठरला आहे. शिवला नेहमीच अभिनेता व्हायचे होते. शिव ठाकरेने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याला पडद्यावर नेहमीच एक नकारात्मक किंवा खलनायकाची भूमिका करायची आहे.

WhatsApp channel