मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  KKBKKJ: काय म्हणता! सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ ओटीटीवर रिलीज होणार? जाणून घ्या...

KKBKKJ: काय म्हणता! सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ ओटीटीवर रिलीज होणार? जाणून घ्या...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 25, 2023 11:32 AM IST

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan OTT Release : ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असतानाच आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan OTT Release : बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खान याचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. सलमान खान त्याच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. अखेर सलमानने ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित करून चाहत्यांना ईदी दिली. एकीकडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असतानाच आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचे म्हटले जात आहे.

ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या चित्रपटाला पहिल्या दिवशी फारसा प्रतिसाद मिळाला नसला, तरी दुसऱ्या दिवशी मात्र चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ पाहायला मिळाली. तर रविवारच्या सुट्टीचा देखील या चित्रपटाला चांगला फायदा झाला. मात्र, नव्या आठवड्याच्या सुरुवातीला पुन्हा एकदा चित्रपटाच्या कमाईची गती संथ झालेली पाहायला मिळाली. या सगळ्यातच आता चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबतची मोठी अपडेट आता समोर येत आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचे बोलले जात आहे.

Tu Chal Pudha: घराला घरपण देणाऱ्या अश्विनीलाच व्हावं लागणार बेघर! ‘तू चाल पुढं’मध्ये नवं वळण

स्वतः सलमान खानने देखील हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार असल्याची हिंट दिली आहे. आता सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ प्रेक्षकांना घर बसल्या पाहायला मिळणार आहे. 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म्सने केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे डिजिटल अधिकार ‘झी ५’ला विकले गेले आहेत. त्यामुळे आता प्रेक्षक आणि चाहते घरात बसून, टीव्ही स्क्रीनवरच या चित्रपटाचा आनंद घेऊ शकणार आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सलमान खानचा हा चित्रपट ८० कोटी रुपयांना विकला गेला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ‘किसी का भाई किसी की जान’ सलमान खानसोबत पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबाती, भूमिका चावला, शहनाज गिल, पलक तिवारी, राघव जुयाल, भाग्यश्री, रामचरण असे अनेक कलाकार या चित्रपटात झळकले आहेत. तर, दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांचीही छोटीशी भूमिका या चित्रपटात आहे.

IPL_Entry_Point

विभाग