मराठी बातम्या  /  Entertainment  /  Aryan Khan Clothing Brand Advertisement Dad Shah Rukh Khan Become Brand Ambassador

Aryan Khan: आर्यन बनला ‘पापा’ शाहरुख खानचा दिग्दर्शक; टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता!

Aryan Khan Clothing Brand advertisement
Aryan Khan Clothing Brand advertisement
Harshada Bhirvandekar • HT Marathi
Apr 25, 2023 07:22 PM IST

Aryan Khan Clothing Brand : आर्यन खानच्या ब्रँडचे प्रमोशन करण्यासाठी किंग खानने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक छोटासा टीझर शेअर केला आहे.

Aryan Khan Clothing Brand : अभिनेता शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशाह म्हटले जाते. आपल्या दमदार अभिनयामुळे शाहरुख खानने लाखोंच्या चाहत्यांच्या हृदयावर आपली अमिट छाप सोडली आहे. शाहरुख खानप्रमाणेच आता त्याचा मुलगा अर्थात आर्यन खान स्वतःची एक वेगळी ओळख बनण्याच्या मार्गावर निघाला आहे. शाहरुख खानप्रमाणेच त्याची दोन मुलं सुहाना आणि आर्यन देखील मनोरंजन विश्वात आपलं नशीब आजमावणार आहे. शाहरुखच्या लाडक्या लेकीने, सुहाना खानने अभिनय क्षेत्राची निवड केली आहे. तर, मुलगा आर्यन खान याने मात्र दिग्दर्शन क्षेत्र निवडले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काही दिवसांपूर्वी आर्यन खानने स्क्रिप्टसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यामुळे आर्यन अभिनय क्षेत्र नाही तर, दिग्दर्शक म्हणून आपला प्रवास सुरू करणार असल्याचे स्पष्ट झाले होते. याशिवाय आई गौरी खानच्या पावलावर पाऊल ठेवत आर्यन बिझनेसकडेही लक्ष देत आहे. आता आर्यन खान याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला असून, त्याने डी'यावोल नावाचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. विशेष म्हणजे आर्यन खानने आपल्या ब्रँडच्या प्रचारासाठी वडील शाहरुख खान यांची निवड केली आहे.

आर्यन खानच्या ब्रँडचे प्रमोशन करण्यासाठी किंग खानने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक छोटासा टीझर शेअर केला आहे. काही सेकंदांच्या या टीझरमध्ये किंग खान ब्लॅकबोर्डवरून 'टाईमलेस' हा शब्द पुसताना दिसत आहे. आर्यन खानने हा व्हिडीओ आर्यन खानने डी'यावोलच्या प्रमोशनसाठी दिग्दर्शित केला आहे. यासोबतच लवकरच या जाहिरातीचा संपूर्ण व्हिडीओ रिलीज करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आर्यन खान या ब्रँडचा सह-मालक आहे. आर्यन खान याने लेटी ब्लागोएवा आणि बंटी सिंह यांच्या सोबत मिळून या ब्रँडची सुरुवात केली आहे.

युरोपस्थित व्यावसायिक भागीदार बंटी सिंह आणि लेटी ब्लागोएवा यांच्यासोबत मिळून आर्यन खान अल्ट्रा-प्रिमियम व्होडका ब्रँड ‘डायव्होल’ लाँच करणार आहे. ‘AB InBev’द्वारे देशात हे प्रोडक्ट विकले जाणार आहे. आर्यन आणि त्याच्या कंपनीने आता त्यांची क्लोदिंग लाईन बाजारात आणली असून, त्यासाठी एक वेबसाईट सुरू केली जाणार आहे. हळूहळू कंपनी भारतात आपला व्यवसाय वाढवेल, असे या कंपनीद्वारे म्हणण्यात आले आहे.

WhatsApp channel