मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jackie Shroff Birthday: जॅकी श्रॉफचं खरं नाव माहितीये का? वाचा अभिनेत्याबद्दल खास गोष्टी...

Jackie Shroff Birthday: जॅकी श्रॉफचं खरं नाव माहितीये का? वाचा अभिनेत्याबद्दल खास गोष्टी...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 01, 2023 07:38 AM IST

Jackie Shroff Birthday: बॉलिवूडचा जग्गू दादा अर्थात अभिनेता जॅकी श्रॉफ आज (१ फेब्रुवारी) आपला वाढदिवस साजरा करत आहे.

Jackie Shroff
Jackie Shroff

Jackie Shroff Birthday : बॉलिवूडचा जग्गू दादा अर्थात अभिनेता जॅकी श्रॉफ आज (१ फेब्रुवारी) आपला वाढदिवस साजरा करत आहे. जॅकी श्रॉफ हे तसं बॉलिवूडचं मोठं नाव. पण, इतकं यश आणि प्रसिद्धी मिळवून देखील अभिनेता नेहमीच आपल्या मातीशी नाळ जोडून राहिलेला दिसतो. जॅकी श्रॉफ यांचा जन्म १ फेब्रुवारी १९५७ रोजी महाराष्ट्रात झाला. बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेल्या जॅकी श्रॉफ यांचे बालपण मात्र अतिशय खडतर होते. सगळ्याला तोंड देत त्यांनी यशाचं शिखर गाठलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एकापेक्षा एक दमदार व्यक्तिरेखा साकारून जॅकी श्रॉफ यांनी चाहत्यांच्या हृदयात आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे. पण, बॉलिवूडमध्ये जॅकी श्रॉफ या नावाने जरी ते प्रसिद्ध असले, तरी ते त्यांचे खरे नाव नाही. जॅकी श्रॉफ यांचे खरे नाव जय किशन काकूभाई श्रॉफ आहे. जयकिशन काकूभाई श्रॉफ यांचे जॅकी श्रॉफ हे नामकरण शाळेत असतानाच झाले होते. इतक्या लांबलचक नावामुळे शाळेत असताना त्यांचे मित्र त्यांना जॅकी या नावानेच हाक मारू लागले. तेव्हापासून जयकिशन काकूभाई श्रॉफ हे जॅकी श्रॉफ झाले.

सुभाष घई यांच्या हिरो या चित्रपटातून जॅकी श्रॉफ यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी जॅकी श्रॉफ या नावानेच मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले. पहिल्याच चित्रपटातून त्यांना तुफान प्रसिद्धी मिळाली होती. 'हिरो' चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या जॅकी श्रॉफचे लाखो चाहते होते. त्यामुळे प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाला जॅकीने आपला चित्रपट साईन करावा असे वाटायचे. त्यासाठी बॉलिवूडचे बडे दिग्दर्शक त्याच्या घरी चकरा मारायचे. त्याकाळात इतकं यश मिळून देखील जॅकी श्रॉफ मुंबईतील चाळीत राहायचे. त्यामुळे जॅकी टॉयलेटमध्ये असताना निर्माता-दिग्दर्शक टॉयलेटच्या बाहेर उभे राहून त्यांची वाट बघायचे.

अतिशय गरिबीतून जॅकी श्रॉफ चित्रपटांच्या दुनियेत आला होता, त्यामुळे त्याला परिस्थितीची जाणीव आणि किंमत चांगलीच ठाऊक होती. यामुळेच 'हिरो' चित्रपट हिट झाल्यानंतरही जॅकीने चाळीमध्ये राहणे सोडले नाही. चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटात जॅकीला कास्ट करण्यासाठी चाळीत जावे लागले. विधू विनोद चोप्रा आणि महेश भट्ट सारखे मोठे दिग्दर्शकही जॅकी श्रॉफला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी चाळीत रांगा लावून असायचे.

IPL_Entry_Point

विभाग