मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Morrya Movie: 'मोऱ्या' चित्रपटाच्या प्रदर्शनातील अडथळा झाला दूर! 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Morrya Movie: 'मोऱ्या' चित्रपटाच्या प्रदर्शनातील अडथळा झाला दूर! 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 04, 2024 03:20 PM IST

Morrya Movie Release Date: एका सफाई कर्मचाऱ्यांची अत्यंत विलक्षण भावस्पर्शी कथा 'मोऱ्या' या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. मात्र, भारतात या चित्रपटाच्या प्रदर्शनात अनेक अडथळे येत होते. परंतु, आता हे अडथळे दूर झाले आहेत.

Morrya Movie Release Date
Morrya Movie Release Date

Morrya Movie Release Date: काही व्यक्ती अश्या असतात की त्यांना प्रत्येक गोष्ट ही संघर्ष केल्यानेच मिळते. त्यात पहिला नंबर म्हणजे सफाई कामगार. त्यांच्या दिवसाची सुरुवातच मुळात जगातील दुर्गंधी साफ करण्यासोबत होते. अश्याच एका सफाई कामगाराचे आयुष्य रेखाटणाऱ्या 'मोऱ्या' चित्रपटाने चित्रपटातील नायकाप्रमाणेच 'सेंसॉर प्रमाणपत्र' मिळविण्यासाठी प्रदीर्घ संघर्ष केला आहे. एका सफाई कर्मचाऱ्यांची अत्यंत विलक्षण भावस्पर्शी कथा 'मोऱ्या' या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. कान्ससह विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये चर्चेत आलेल्या 'मोऱ्या' या चित्रपटाने जाणकार रसिक समीक्षकांचे लक्ष वेधले होते. मात्र, भारतात या चित्रपटाच्या प्रदर्शनात अनेक अडथळे येत होते. परंतु, आता हे अडथळे दूर झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

'मोऱ्या'ची व्यथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजताच त्यांनी सेंसॉर अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन समज दिली आणि त्यांनतर जवळपास तीन वर्ष सुरु असलेला हा प्रदीर्घ संघर्षाचा लढा संपून 'मोऱ्या' अखेर सेन्सॉरमुक्त झाला. ‘मोऱ्या’ची ही लढाई सप्टेंबर २०२२ पासून सुरु होती, ती अखेर २७ फेब्रुवारी २०२४ रोजी संपुष्टात आली. हे प्रकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी ते त्यात तातडीने लक्ष घालून कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने अखेर 'मोऱ्या' सेंन्सॉरमुक्त मुक्त झाला आहे.

Abhishek Aishwarya News: घटस्फोटाची चर्चा करणाऱ्यांना चपराक! अंबानींच्या सोहळ्यात बच्चन कुटुंबाची धमाल; पाहा Viral Video

सफाई कर्मचाऱ्यांची हृदयस्पर्शी कथा

'टॉर्टुगा मोशन पिक्चर्स'ची निर्मिती असलेल्या या चित्रपटात एका सफाई कर्मचाऱ्यांची हृदयस्पर्शी कथा रेखाटण्यात आली असून, ती अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी आपल्या सहजसुंदर नैसर्गिक-संयमी अभिनयाने हुबेहूब उभी केली आहे. प्रमुख सहकलाकार उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, सुरज अहिवळे, बालकलाकार रुद्रम बर्डे इत्यादींचा अभिनय आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार मिळविणारा आणि सफाई कामगाराच्या जीवनावर बेतलेला 'मोऱ्या' आता येत्या २२ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये धूम!

एलएचआयएफएफ बार्सिलोना, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, खजुराहो आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव, झारखंड आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव २०२२, पेनझान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव, अयोध्या फिल्म फेस्टिव्हल, लेक सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, बॉलिवूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल इत्यादी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांत 'मोऱ्या'ने उत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळवला आहे. लंडन येथील 'सोहोवाला कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा' या लंडनच्या आयकॉनिक सिनेमा हॉलमध्ये पहिल्यांदा प्रीमियर शो करण्याचा मान 'मोऱ्या' या मराठी चित्रपटाने मिळवून, युरोपमधील प्रेक्षकांची हाऊसफुल्ल पसंती मिळवली आहे. कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'मोऱ्या'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हा पासूनच या चित्रपटाविषयी कुतूहल वाढू लागले होते.

IPL_Entry_Point