Abhishek Bachchan-Aishwarya Rai Viral Video: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. या लग्नाआधी अंबानी कुटुंबाने राधिका आणि अनंत अंबानी यांच्यासाठी खास प्री वेडिंग सोहळा आयोजित केला होता. अंबानी कुटुंबाने १ मार्च ते ३ मार्च या कालावधीत जामनगरमध्ये एका भव्य प्री-वेडिंग पार्टीचे आयोजन केले होते. तीन दिवस चाललेल्या या सेलिब्रेशनमध्ये बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आणि जगभरातील अनेक बड्या व्यक्तींनी सहभाग घेतला होता. याच लग्न सोहळ्यात बच्चन कुटुंब देखील एकत्र दिसलं. यामुळे आता त्यांच्यातील वादांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी, ३ मार्चला बच्चन कुटुंबही जामनगरला पोहोचले. अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय-बच्चन त्यांची मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत हा दिमाखदार सोहळा एन्जॉय करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांनी मॅचिंग कपडे परिधान करून दिसले होते. यादरम्यान ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या म्युझिक एन्जॉय करताना दिसल्या आहेत. तर, अभिषेकही या दोघींसोबत सेलिब्रेशन एन्जॉय करताना दिसला आहे. या तिघांना एकत्र पाहून चाहत्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या विभक्त झाल्याच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या.
अनंत-राधिकाच्या लग्नाआधीच्या समारंभात एकत्र येण्यापासून ते एकत्र सेलिब्रेशनला हजर राहण्यापर्यंत, अभिषेक आणि ऐश्वर्याने पुन्हा एकदा त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. याआधी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, अभिषेक आणि ऐश्वर्या यांचे वैवाहिक जीवन वादात अडकले होते. ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत तिच्या आईच्या घरी शिफ्ट झाल्याचे देखील म्हटले जात होते. मात्र, या चर्चेदरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक अनेकदा एकत्र दिसले आहेत आणि त्यांच्या विभक्त होण्याच्या या चर्चा केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याचा डेब्यू चित्रपट 'द आर्चीज'च्या स्क्रिनिंगदरम्यान देखील ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र दिसले होते.