लेक दुबईला घेऊन गेली आणि भाऊ कदमला खास सरप्राईज दिलं! बाप-लेकीचा हळवा बंध दाखवणारा video Viral-marathi actor bhau kadam received surprise gift from his elder daughter mrunmayi kadam video viral ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  लेक दुबईला घेऊन गेली आणि भाऊ कदमला खास सरप्राईज दिलं! बाप-लेकीचा हळवा बंध दाखवणारा video Viral

लेक दुबईला घेऊन गेली आणि भाऊ कदमला खास सरप्राईज दिलं! बाप-लेकीचा हळवा बंध दाखवणारा video Viral

Apr 24, 2024 09:23 PM IST

एरव्ही प्रेक्षकांना सरप्राईज करणाऱ्या भाऊ कदमला आता त्याच्या लेकीने सरप्राईज देत खुश केलं आहे. बापलेकीच्या हळव्या बंधांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लेक दुबईला घेऊन गेली आणि भाऊ कदमला खास सरप्राईज दिलं! बाप-लेकीचा हळवा बंध दाखवणारा video Viral
लेक दुबईला घेऊन गेली आणि भाऊ कदमला खास सरप्राईज दिलं! बाप-लेकीचा हळवा बंध दाखवणारा video Viral

आपल्या विनोदी अभिनयाने अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजे भाऊ कदम. ‘चला हवा येऊ द्या’, ‘फु बाई फु’ अशा लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून भाऊ कदम याने प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा मिळवली आहे. अनेक कार्यक्रमातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करण्यात भाऊ कदमचा खूप मोठा वाटा आहे. भाऊ कदमच्या अचूक कॉमेडी टायमिंगमुळे त्याने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. लवकरच भाऊ कदम एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, एरव्ही प्रेक्षकांना सरप्राईज करणाऱ्या भाऊ कदमला आता त्याच्या लेकीने सरप्राईज देत खुश केलं आहे. बापलेकीच्या हळव्या बंधांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असणारा भाऊ कदम नेहमीच काही ना काहीतरी शेअर करत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून भाऊ कदम चाहत्यांच्या संपर्कात असतो. आता भाऊ कदम ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कलर्स मराठी वाहिनीवरील नव्या कोऱ्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने अभिनेता सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय झाला आहे. भाऊ कदम नेहमीच आपल्या कुटुंबाबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. तर, त्याची मोठी मुलगी देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ती देखील एक कंटेंट क्रिएटर झाली आहे.

मुलीने दिले सरप्राईज!

इतकंच नाही तर, भाऊ कदमच्या मुलीने वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय देखील सुरू केला आहे. आता त्याची हीच मुलगी एका वेगळ्या क्षेत्रात आपलं नाव चांगलंच गाजवते आहे. भाऊ कदमच्या मुलीने त्याच्यासाठी स्वतःच्या कमाईतून एक खास आणि महागडं गिफ्ट घेतलंय. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. स्वतःच्या कमाईतून तिने हे गिफ्ट आपल्या वडिलांसाठी खरेदी केलं आहे. भाऊ कदमची मोठी मुलगी मृण्मयी कदम हिने त्याला दुबईतील एका शूजच्या दुकानात नेऊन, त्याच्यासाठी खास शूज भेट म्हणून घेतले आहेत.

भाऊ कदम काय म्हणाला?

मात्र, प्रत्येक भारतीय पालकाप्रमाणेच भाऊ कदमने देखील लेकीला थेट थँक्यू म्हणण्याऐवजी ‘मला कशाला घेतलं हे गिफ्ट, हे पैसे तुला कामी आले असते, ठेवायचे ना तुझ्याकडे’, असं म्हणत लेकीला टिपिकल अंदाजात थँक्यू म्हटलं आहे. या दोघांचा हा बाँड पाहून प्रत्येकालाच आपल्या वडिलांची आठवण आली आहे. मृण्मयीच्या या पोस्टला चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया आणि लाईक्स देत तिचं कौतुक केलं आहे. सध्या या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.