Bhau Kadam Birthday: जेव्हा मित्रांनी भाऊ कदमला १-२ हजार रुपये उसने द्यायलाही दिला होता नकार! वाचा किस्सा..-happy birthday bhau kadam when friends refused to even lend 1 2 thousand rupees to bhau kadam ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bhau Kadam Birthday: जेव्हा मित्रांनी भाऊ कदमला १-२ हजार रुपये उसने द्यायलाही दिला होता नकार! वाचा किस्सा..

Bhau Kadam Birthday: जेव्हा मित्रांनी भाऊ कदमला १-२ हजार रुपये उसने द्यायलाही दिला होता नकार! वाचा किस्सा..

Mar 03, 2024 10:23 AM IST

Happy Birthday Bhau Kadam: स्वतःची सगळी दुःख विसरून आणि अतिशय खडतर परिस्थितीवर मात करून, भाऊ कदम यांनी अवघ्या प्रेक्षकांना खळखळवून हसवले.

Happy Birthday Bhau Kadam
Happy Birthday Bhau Kadam

Happy Birthday Bhau Kadam: आपल्या दमदार विनोदी अभिनयाने सगळ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे भाऊ कदम आज (३ मार्च) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. कलेला कोणत्याही रंग रुपाची आणि वयाची मर्यादा नसते हे भाऊ कदम यांनी साऱ्या जगाला दाखवून दिलं आहे. स्वतःची सगळी दुःख विसरून आणि अतिशय खडतर परिस्थितीवर मात करून, भाऊ कदम यांनी अवघ्या प्रेक्षकांना खळखळवून हसवले. भाऊ कदम यांचा अभिनेता होण्याचा हा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. त्यांनी इथवर पोहचण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी ही आली होती, जेव्हा त्यांना मित्रांनी देखील पैसे उसने देण्यास नकार दिला होता.

‘फु बाई फु’, ‘चला हवा येऊ द्या’ या सारख्या कार्यकमातून भाऊ कदम घराघरांत लोकप्रिय झाले. त्यांच्या या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले. या शोनंतर भाऊ कदम यांनी काही मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले. ‘पांडू’, ‘टाईमपास’, ‘मधू इथे अन चंद्र तिथे’ या आणि अशा अनेक चित्रपटातून भाऊ कदम यांनी मोठ्या पडदा देखील गाजवला. रंगभूमीवर देखील भाऊ कदम यांनी आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला.

Jhalak Dikhhla Jaa 11 Winner: वाईल्ड कार्ड म्हणून आली अन् ट्रॉफी घेऊन गेली; मनीषा राणीला मिळाली बक्षिसाची मोठी रक्कम!

वडिलांच्या निधनानंतर पाहिले हलाखीचे दिवस

भाऊ कदम यांचे बालपण वडाळ्यात पार पडले. वडिलांचं निधन झाल्यावर त्यांना वडाळ्याच घर सोडावं लागलं होतं. वडाळ्याच घर सोडल्यानंतर भाऊ आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब डोंबिवलीमध्ये राहायला गेलं. आपल्या कुटुंबाची आर्थिक गरज भागावी म्हणून भाऊ कदम यांनी दारोदारी जाऊन मतदार नोंदणीचे काम केले होते. घरचा खर्च भागात नव्हता म्हणून त्यांनी आपल्या भावासोबत मिळून एक टपरी सुरू केली. सगळं कष्ट करत असताना देखील भाऊ कदम यांनी त्यांची अभिनयाची आवड जोपासली होती. नाटकाच्या माध्यमातून भाऊचा अभिनेता म्हणून मनोरंजन विश्वातला प्रवास सुरू झाला होता.

कुटुंबाने दिली साथ

या सगळ्यात एकवेळ अशी आली होती जेव्हा जवळच्या मित्रांनीही भाऊ कदम यांची साथ सोडली होती. मात्र, अशावेळी कुटुंबाने त्यांची साथ दिली. एका पुरस्कार सोहळ्यासाठी भाऊ कदम यांना दुबईला जायचे होते. पण, तेव्हा त्यांच्याकडे पैसेच नव्हते. पासपोर्ट किंवा इतर सगळा खर्च महेश मांजरेकर करणार होते. त्यांना फक्त प्रव्साला जायचं होतं. मात्र, तरीही जाताना त्यांच्या खिशात काहीही पैसे नव्हते. त्यावेळी त्यांनी मित्रांकडे १-२ हजार उसने मागितले होते. मात्र, हा पैसे परत करणार नाही, असे म्हणत मित्रांनी पैसे देण्यास नकार दिला. घरच्यांनी ही परिस्थिती पाहिल्यावर भाऊंच्या हातावर पैसे ठेवले. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीने स्वतःचे दागिने मोडून भाऊला पैसे दिले होते.