मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jhalak Dikhhla Jaa 11 Winner: वाईल्ड कार्ड म्हणून आली अन् ट्रॉफी घेऊन गेली; मनीषा राणीला मिळाली बक्षिसाची मोठी रक्कम!

Jhalak Dikhhla Jaa 11 Winner: वाईल्ड कार्ड म्हणून आली अन् ट्रॉफी घेऊन गेली; मनीषा राणीला मिळाली बक्षिसाची मोठी रक्कम!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 03, 2024 08:55 AM IST

Jhalak Dikhhla Jaa 11 Winner: ‘बिग बॉस’मध्ये झळकलेली बिहारची मनीषा राणी 'झलक दिखला जा ११' ची विजेती ठरली.

Jhalak Dikhhla Jaa 11 Winner
Jhalak Dikhhla Jaa 11 Winner

Jhalak Dikhhla Jaa 11 Winner: डान्स रिॲलिटी शो ‘झलक दिखला जा’चा ११वा सीझन आता संपला आहे. या शोचा ग्रँड फिनाले देखील खूपच धमाकेदार होता. प्रत्येक स्पर्धकाने आपल्या सादरीकरणाने शोच्या जज आणि प्रेक्षकांची मने जिंकली. पण, प्रेक्षकांनी भरघोस मतं देऊन ‘बिग बॉस’च्या मनीषा राणीला विजेती बनवले आहे. ‘बिग बॉस’मध्ये झळकलेली बिहारची मनीषा राणी 'झलक दिखला जा ११' ची विजेती ठरली. मनीषाने शोएब इब्राहिम आणि अद्रिजा सिन्हा यांना हरवून विजेतेपद पटकावले. यासोबतच मनीषा राणीला बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळाली आहे.

पुन्हा एकदा वाईल्ड कार्ड स्पर्धकाने इतिहास रचला!

मनीषा राणीने शोच्या मध्यातच एन्ट्री केली होती. तिने या शोमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली होती. मनीषासह, धनश्री वर्मा, शोएब इब्राहिम, अद्रिजा सिन्हा आणि श्रीराम चंद्रा यांनी टॉप ५ फायनलमध्ये पोहोचले, यानंतर या स्पर्धेमध्ये मनीषा, शोएब आणि अद्रिजा यांनी लोकांकडून मिळालेल्या मतांच्या आधारे टॉप ३मध्ये आपले स्थान मिळवले. तर, शेवटच्या फेरीत मात्र मनीषाने शोएब इब्राहिम आणि अद्रिजा सिन्हा यांना हरवून विजेतेपद पटकावले. वाईल्ड कार्ड स्पर्धकाने हा शो जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, यूट्यूबर एल्विश यादवने ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री केली होती आणि तो शोचा विजेता बनला होता. मनीषा ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये झळकली होती.

Shankar Mahadevan Birthday: ‘ब्रेथलेस’ शंकर महादेवन यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

मनीषा राणीला करायचीये बॉलिवूडमध्ये एन्ट्री!

'झलक दिखला जा ११'च्या विजेत्या ठरलेल्या मनीषा राणीला ट्रॉफीसह ३० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. तर, तिचा कोरिओग्राफर आशुतोष पवार यांला १० लाख रुपये मिळाले. यासोबतच दोघांनी दुबईजवळील एका बेटावरही सहलीची तिकिटे देखील मिळाली आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’ या शोमुळे मनीषा राणी प्रसिद्धीच्या झोतात आली होती. सोशल मीडियावरही ती अतिशय लोकप्रिय आहे. तिच्या बोलण्याच्या स्टाईलने चाहत्यांचीच नाही, तर स्टार्सचीही मने जिंकली आहेत.

मनीषाने मानले चाहत्यांचे आभार!

'झलक दिखला जा ११' हा शो जिंकल्यानंतर मनीषा राणीने आपला आनंद इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. पोस्ट करताना मनीषाने शोच्या फिनालेचे काही फोटो शेअर केले आणि एक लांबलचक पोस्टही लिहिली. त्याचबरोबर मनीषाच्या पोस्टवर चाहतेही भरपूर कमेंट करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग