मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: रामलल्लासमोर ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी यांनी सादर केलं भरतनाट्यम! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Viral Video: रामलल्लासमोर ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी यांनी सादर केलं भरतनाट्यम! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 18, 2024 04:01 PM IST

Hema Malini Viral Video: हेमा मालिनी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर राग सेवा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हेमा मालिनी अयोध्येच्या राम मंदिरात भरतनाट्यम करताना दिसत आहेत.

Hema Malini Viral Video
Hema Malini Viral Video

Hema Malini Viral Video: बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी आजही त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखल्या जातात. आजही त्यांच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहे. हेमा मालिनी यांनी अभिनयापासून राजकारणापर्यंत स्वतःची एक खास छाप सोडली आहे. हेमा मालिनी आजही शास्त्रीय नृत्य क्षेत्रात सक्रिय असून, त्यांना डान्सची खूप आवड आहे. त्यांचे डान्स शो आजही तुफान हिट आहे. हेमा मालिनी आपल्या मुलींसोबत अनेकदा भरतनाट्यम सादर करताना दिसतात. नुकतीच हेमा मालिनी यांनी अयोध्येच्या राम मंदिरात 'राग सेवा' अर्पण केली. यादरम्यान, हेमा मालिनी यांचा राग सेवा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये हेमा मालिनी यांचा डान्स पाहून चाहते त्यांचे तोंडभरून कौतुक करत आहेत.

हेमा मालिनी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर राग सेवा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हेमा मालिनी अयोध्येच्या राम मंदिरात भरतनाट्यम करताना दिसत आहेत. हेमा मालिनी यांची प्रत्येक डान्स स्टेप पाहून चाहत्यांना नजर त्यांच्यावर खिळत आहे. यावेळी हेमा मालिनी यांनी निळ्या रंगाची सिल्क साडी परिधान केली होती. या साडीमध्ये त्या खूपच सुंदर दिसत होत्या. हेमा मालिनी यांनी या साडीसोबत गोल्ड टेम्पल ज्वेलरी घातली होती. यासोबत त्यांनी आपल्या केसांमध्ये गजरा माळला होता. हेमा मालिनी यांचा हा संपूर्ण लूक खूपच सुंदर दिसत आहे.

Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा जीव थोडक्यात बचावला; अभिनेत्रीच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

हेमा मालिनी यांचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना चाहते त्यांच्या डान्ससोबतच हेमा मालिनी यांच्या लूकचे देखील कौतुक करत आहेत. या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, 'तुमच्या या सुंदर कलाकृतीचं कौतुक करण्यासाठी शब्द देखील अपुरे आहेत. खूपच सुंदर नृत्य आहे.’ तर, दुसऱ्या एका युजरने लिहिले की, 'हेमा जी, तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा आहात.' हेमा मालिनी यांच्या या व्हिडीओला आतापर्यंत खूप व्ह्यूज मिळाले आहेत.

हेमा मालिनी यांच्या या डान्स व्हिडीओला खूप पसंती मिळत आहे. हेमा मालिनी यांनी आपला परफॉर्मन्सपूर्वीच्या रिहर्सलचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्या साध्या साडीत आणि विना मेकअप दिसल्या होत्या. या फोटोच्या कॅप्शनमध्येच त्यांनी म्हटले होते की, त्या राम मंदिरात 'राग सेवा' करणार आहेत.

IPL_Entry_Point

विभाग