मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kushal Badrike: महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर कुशल बद्रिके हिंदीतही झळकणार! व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Kushal Badrike: महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर कुशल बद्रिके हिंदीतही झळकणार! व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 18, 2024 12:27 PM IST

Kushal Badrike In Hindi Serial: दमदार विनोदांनी आणि अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राला खळखळवून हसवणाऱ्या कुशल बद्रिकेने आता हिंदी मनोरंजन विश्वात देखील एन्ट्री घेतली आहे.

Kushal Badrike
Kushal Badrike

Kushal Badrike In Hindi Serial: आपल्या दमदार विनोदांनी आणि अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राला खळखळवून हसवणाऱ्या कुशल बद्रिकेने आता हिंदी मनोरंजन विश्वात देखील एन्ट्री घेतली आहे. नुकतीच त्याने एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या आगामी नव्या हिंदी शोची झलक पाहायला मिळाली आहे. कुशल बद्रिके याने ही पोस्ट शेअर करताच आता चाहते आनंदून गेले आहेत. कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर आता चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत.

अभिनेता कुशल बद्रिकेने त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले आहे.‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून कुशल नेहमीच प्रेक्षकांना खळखळवून हसवत आला आहे.‘चला हवा येऊ द्या’ हा लोकप्रिय कार्यक्रम गेली अनेकवर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील विनोदच नव्हे, तर कलाकारांनी त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना भरपूर हसवलं. ‘चला हवा येऊ द्या’ गाजवल्यानंतर आता कुशल बद्रिके हिंदी मनोरंजन विश्व गाजवायला देखील सज्ज झाला आहे. आता हिंदीतही कुशल बद्रिके याच्या अभिनयाची जादू पाहायला मिळणार आहे.

Sanjay Dutt: ‘बाहुबली’मध्ये संजय दत्त साकारणार होता ‘कटप्पा’ची भूमिका! ‘या’ गोष्टीमुळे थोडक्यात हुकली संधी

नव्या मालिकेतून कुशल बद्रिके करणार धमाल

कुशल बद्रिके आता हिंदीतही आपल्या विनोदाची जादू दाखवणार आहे. सोनी टीव्हीवरील‘मॅडनेस मचाऐंगे’या नव्या विनोदी शोमधून तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या शोचा एका प्रोमो सोनीच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर आता कुशल बद्रिके याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. आपल्या विनोदी शोचा हा प्रोमो शेअर करत त्याने लिहिले की,‘एका हिंदी मालिकेतून तुम्हाला हसवण्यासाठी येत आहे. तुमचं प्रेम व आशीर्वाद असू द्या’. कुशल बद्रिके याने ही पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे.

कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकार कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अभिनेते अभिजित चव्हाण यांनी या पोस्टवर कमेंट करत म्हटलं की, ‘माझं प्रेम माझ्या शुभेच्छा आशिर्वाद सगळं तुझ्या पाठीशी आहे.....गाजवून ये.....हिला डाल स्टेज..मेरे कुशडु बबडू’. संतोष जुवेकर, समीर गुजर, गौरव दुबे अशा अनेक कलाकारांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. तर, चाहते देखील या पोस्टवर भरभरून कमेंट्स करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग