Rashmika Mandanna Airplane Emergency Landing: साऊथची टॉप अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने नुकताच बॉलिवूड डेब्यू केला आहे. तिचा बॉलिवूड डेब्यू खूपच धमाकेदार होता. ‘ॲनिमल’ या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली आहे. रश्मिका नेहमीच काहीना काही कारणामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा रश्मिका मंदाना चर्चेत आली आहे. रश्मिका मंदाना प्रवास करत असलेल्या फ्लाइटचे नुकतेच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. आता अभिनेत्रीने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतून तिने आपला अनुभव शेअर करत, इमर्जन्सी लँडिंगबद्दल सांगितले आहे.
रश्मिकाने शनिवारी इन्स्टाग्राम स्टोरीवर अभिनेत्री श्रद्धा दाससोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘फक्त तुमच्या माहितीसाठी, आज आम्ही अशा प्रकारे मृत्यूपासून थोडक्यात बचावलो.’ सुरक्षितपणे जमिनीवर उतरल्यानंतर रश्मिका आणि श्रद्धाच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू उमटले. त्यांनी यासोबत आपल्या पायाचा फोटो देखील शेअर केला आहे. फ्लाईटच्या सीटजवळ त्यांनी आपले पाय अडकवून ठेवले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिका मंदाना, श्रद्धा आणि इतर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर विस्ताराच्या फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर प्रवाशांना अतिशय विचित्र अनुभवाला सामोरे जावे लागले. यावेळी संपूर्ण फ्लाईटमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. रश्मिकाचे विमान मुंबईहून हैदराबादला जात होते. तांत्रिक बिघाडामुळे विमाननाचे ३० मिनिटांनी पुन्हा मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या घटनेत प्रवाशांच्या जीवाला कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.
रश्मिका मंदाना लवकरच नेहा धुपियाच्या चॅट शो ‘नो फिल्टर नेहा’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच रश्मिका मंदाना नेहा धुपियासोबत शोच्या रेकॉर्डिंगसाठी मुंबईत दिसली होती. रश्मिकाला साऊथसोबतच हिंदी सिनेसृष्टीही खूप पसंत केले जात आहे. 'ॲनिमल'मधली तिची गीतांजली ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. रश्मिका मंदाना हिच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री लवकरच 'पुष्पा २' यावर्षी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट यंदाच्या स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची टक्कर रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'सोबत होणार आहे.