देशभरात राम मंदिर उद्घाटनाचा उत्साह साजरा केला जात आहे. त्यामध्ये बॉलिवूड कलाकारांचा देखील समावेश आहे.
(1 / 5)
अयोध्येतील राम मदिरात २२ जानेवारी रोजी राम लल्लाच्या मूर्तीची प्राण-प्रतिष्ठापना केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी भव्य दिव्य तयारी केली जात आहे. त्यामुळे अवघा देश श्रीराममय झाला आहे. या राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेक कलाकारांनी देणग्या दिल्या आहेत. यामध्ये कोणते कलाकार आहेत? चला जाणून घेऊया…
(2 / 5)
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने राम मंदिराच्या उभारणीसाठी मोठी रक्कम दिल्याची माहिती समोर आली आहे.
(3 / 5)
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी मोठी देणगी दिली आहे. पण एकूण रक्कम अद्याप समोर आलेली नाही.
(4 / 5)
अभिनेते अनूपम खेर यांनी देखील राम मंदिरासाठी देणगी दिली आहे.
(5 / 5)
‘शक्तिमान’ फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देणगी दिल्याची माहिती दिली. त्यांनी १,११,१११ रुपये देणगी दिली आहे.
(6 / 5)
दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याणने राम मंदिरासाठी ३० लाख रुपये दान म्हणून दिले आहेत.