मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Yash Birthday: बस चालकाचा मुलगा कसा बनला ‘रॉकी भाई’? वाचा अभिनेता यश याच्या फिल्मीप्रवासाबद्दल....

Yash Birthday: बस चालकाचा मुलगा कसा बनला ‘रॉकी भाई’? वाचा अभिनेता यश याच्या फिल्मीप्रवासाबद्दल....

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 08, 2024 07:37 AM IST

Happy Birthday Rocky Bhai AKA Yash: ‘केजीएफ’मुळे केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही अभिनेता यशचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे

Happy Birthday Rocky Bhai AKA Yash
Happy Birthday Rocky Bhai AKA Yash (HT)

Happy Birthday Rocky Bhai AKA Yash: 'रॉकिंग स्टार' अभिनेता यश याची आता कोणतीही वेगळी ओळख सांगण्याची तशी गरज नाही. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत चाहते त्याला ‘रॉकी भाई’ या नावानेच ओळखतात. ‘केजीएफ’मुळे केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही त्याचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. आज जरी अभिनेता भरपूर यशस्वी दिसत असला, तरी या मागचा त्याचा प्रवास अतिशय कठीण होता. एकाछोट्याशा गावातून आज जगभरात ओळख मिळवणाऱ्या ‘केजीएफ’च्या ‘रॉकी भाई’बद्दल अर्थात अभिनेता यशबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात...

ट्रेंडिंग न्यूज

यशचा जन्म ८ जानेवारी १९८६ रोजी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील भुवनहल्ली या छोट्याशा गावात झाला. यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा असे आहे. यशचे वडील हे सरकारी बस चालक होते. यशला लहानपणापासूनच मनोरंजन विश्वाचा ओढा होता. इतकंच नाही तर, मनोरंजन विश्वातच करिअर करायचं असा त्याचा पक्का निर्णय होता. मनोरंजन विश्वात काम करण्यासाठी त्याने घरून ३०० रुपये घेऊन थेट हैदराबाद गाठलं होतं.

Aishwarya Rai: घर सोडलं, घटस्फोट घेतला... सगळ्या अफवांना ऐश्वर्या रायचं सडेतोड उत्तर! पुन्हा दिसली बच्चन कुटुंबासोबत!

यशने स्वत:ला मनोरंजन विश्वात स्थिरस्थावर करण्यासाठी खूप मेहनत घेतली. यशच्या करिअरची सुरुवात नाटकांपासून झाली. यानंतर तो हळूहळू छोट्या पडद्याकडे वळला. यशने २००८मध्ये 'मोगीना मनसू'म या चित्रपटाधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. यशने त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी पुरस्कारही जिंकला. इथूनच त्याचा फिल्मी प्रवास खर्या अर्थाने सुरू झाला. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही.

यशने 'राजधानी', 'ड्रामा', 'गुगली', 'राजा हुली', 'मिस्टर अँड मिसेस रामाचारी' यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. 'मास्टरपीस' सारख्या चित्रपटात काम करून त्याने अवघ्या प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण, त्याने एक असा चित्रपट चित्रपट केला, ज्या चित्रपटाने केवळ यशलाच प्रसिद्धी नाही, तर कन्नड चित्रपटसृष्टीला एक नवी ओळख दिली. यशचा हा चित्रपट म्हणजे ‘केजीएफ’. यश अभिनित ;केजीएफ’ ही चित्रपटाची एक सीरिज असून, यातील दोन चित्रपट ‘केजीएफ’ आणि ‘केजीएफ २’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता चाहते या चित्रपटांच्या आगामी भागांसाठी आतुर झाले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग