आजकाल अनेक बॉलिवूड कलाकार हे दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारताना दिसत आहेत. तर काही दाक्षिणात्य सुपरस्टार कलाकार बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. आता बॉलिवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करीना कपूर खान दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. ती 'केजीएफ' या सुपरहिट चित्रपटातील अभिनेता यशसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
काही दिवसांपूर्वीच यशने नव्या प्रोजेक्टची घोषणा केली. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव 'टॉक्सिक' असे आहे. या चित्रपटाची घोषणा केल्यापासून सर्वत्र चर्चा सुरु होती ती म्हणजे स्टारकास्टची. या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता यशसोबत या चित्रपट अभिनेत्री करीना कपूर खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले आहे.
वाचा: व्हिडीओ कॉलवर मिठी मारायची सोय नाही; अभीमुळे आजी झाल्या भावूक
दिग्दर्शक गीतू मोहनदास नेहमीच समीक्षकांच्या पसंतीस उतरते. मोहनदास हे यशच्या नव्या प्रोजेक्टचे दिग्दर्शन करणार आहे. यशच्या सिनेमांनी आजवर नेहमीच बंप्पर कमाई केली आहे. दरम्यान, आता नव्या टॉक्सिक या सिनेमातील कास्टही मोठी आहे. आता यश आणि करिना कपूर एकत्रित येणार असल्याने हा सिनेमाही तुफान कमाई करेल, असे बोलले जात आहे.
करीनाने २४ वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा पहिला सिनेमा 'रिफ्यूजी' हा होता. आतापर्यंत तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र तिने आजवर कोणत्याही दाक्षिणात्य चित्रपटात काम केले नव्हते. आता ती पदार्पण करतेय त्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे. या चित्रपटाविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.