मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aishwarya Rai: घर सोडलं, घटस्फोट घेतला... सगळ्या अफवांना ऐश्वर्या रायचं सडेतोड उत्तर! पुन्हा दिसली बच्चन कुटुंबासोबत!

Aishwarya Rai: घर सोडलं, घटस्फोट घेतला... सगळ्या अफवांना ऐश्वर्या रायचं सडेतोड उत्तर! पुन्हा दिसली बच्चन कुटुंबासोबत!

Jan 07, 2024 03:49 PM IST

Aishwarya Rai Abhishek Bachchan Together: पुन्हा एकदा ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्पॉट झाली आहे.

Aishwarya Rai Abhishek Bachchan Together
Aishwarya Rai Abhishek Bachchan Together (HT City Instagram)

Aishwarya Rai Abhishek Bachchan Together: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिच्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याला घटस्फोट दिला असून, तिने बच्चन कुटुंबाचे घर देखील सोडले आहे, असे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले होते. मात्र, यावर ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन किंवा अमिताभ बच्चन यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. दरम्यानच्या काळात अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र देखील दिसले होते. तरीही त्यांच्या बेबनाव असल्याच्या चर्चा सुरूच होत्या. मात्र, आता ऐश्वर्याने पुन्हा एकदा अशा अफवा पसरवणाऱ्यांना सणसणीत चपराक दिली आहे. पुन्हा एकदा ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्पॉट झाली आहे.

अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्य बच्चन यांनी एकत्र कब्बडी सामन्याला हजेरी लावली होती. यावेळी संपूर्ण बच्चन कुटुंब अतिशय आनंदात दिसत होत. सगळ्यांनी मिळून यावेळी कबड्डी टीमला प्रोत्साहन दिलं. यावेळी सगळेच खूप आनंदात दिसले. तर, छोट्याशा आराध्याने देखील यावेळी आपल्या कुटुंबासोबत हा खेळ पाहिला. यावेळी या कुटुंबाकडे पाहून ते सगळेच खूप आनंदी असल्याचे दिसले. यावरूनच घटस्फोट आणि ऐश्वर्याचं घर सोडून जाणं या केवळ अफवा असल्याचं सिद्ध होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Tharala Tar Mag: ‘मिसेस सायली प्लीज मला माफ करा’; अखेर अर्जुनलाच मागावी लागणार माफी!

शनिवारी रात्री ऐश्वर्या, अमिताभ आणि आराध्या बच्चन मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियमवर कबड्डी सामन्यासाठी आले होते. यावेळी ऐश्वर्या पती अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत बसलेली दिसली. ऐश्वर्या, अभिषेक, अमिताभ आणि आराध्या यांनी ‘जयपूर पिंक पँथर्स’ची जर्सी परिधान केली होती. ऐश्वर्याला तिच्या सासऱ्यांसोबत पाहून तिच्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा केवळ अफवा असल्याचं सिद्ध झालं आहे.

गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चनच्या हातात लग्नाची अंगठी दिसली नव्हती. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला की, काय अशी अटकळ चाहत्यांनी बांधली होती. मात्र, या जोडीकडून याबाबत काहीही सांगण्यात आलेले नव्हते. या चर्चांदरम्यान, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक समारंभात अमिताभ बच्चन त्यांची नात आराध्या बच्चनचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत ऐश्वर्या आणि अभिषेकही दिसले होते.

WhatsApp channel