Tharala Tar Mag Latest Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता प्रेक्षकांना कठोर अर्जुनचं एका हळवं आणि प्रेमळ रूप पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रागावून दूर झालेल्या सायलीची समजूत काढण्याचा प्रयत्न अर्जुन करणार आहे. यासाठी आता अर्जुन सायलीची माफी मागणार आहे. हातात ‘सॉरी’चा बोर्ड घेऊन अर्जुन सायलीकडे पोहोचणार आहे. अर्जुन सायलीची समजूत काढण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. आता रागावलेल्या सायलीचा रुसवा दूर होईल की, नाही हे पाहणं रंजक ठरणार आहे.
अर्जुन आपला भूतकाळ शोधत आहे, याची सायलीला कल्पनाच नव्हती. सायलीला तिचं कुटुंब मिळावं त्यासाठी अर्जुन प्रयत्न करत होता. मात्र, आता हीच गोष्ट सायलीला कळली आहे. यामुळेच सायली अर्जुनवर रागावली होती. तर, अर्जुन देखील सायलीवर ओरडल्याने तिचा रुसवा आणखीनच वाढला होता. अर्जुनने सायलीला ‘तुम्ही माझ्याशी बोलू नका’, असे म्हटले होते. अर्जुनची हीच गोष्ट सायलीच्या मनाला लागली. त्यामुळे सायलीने अर्जुनपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता.
आपल्या निर्णयानुसार सायली अर्जुनचं घर सोडून आपल्या माहेरी निघून गेली होती. आता रागावलेल्या सायलीचा रुसवा दूर तरी कसा करावा, याच्या विचारात अर्जुन पडला होता. त्याने आपल्या मनातील हीच वेदना चैतन्यकडे बोलून दाखवली होती. त्यावर आता चैतन्यने अर्जुनला एक उपाय दिला. तू स्वतः जाऊन सायलीची माफी माग आणि तिला परत घेऊन ये, असे चैतन्यने अर्जुनला सुचवले. आता हाही प्रयत्न करून पाहून, म्हणून अर्जुन खरंच सायलीकडे जाऊन तिची माफी मागणार आहे.
‘मिसेस सायली प्लीज मला माफ करा’, असा बोर्ड हातात घेऊन अर्जुन सायलीच्या माहेरी म्हणजेच कुसुम ताईंच्या घरी जाणार आहे. सॉरीचा बोर्ड दाखवून अर्जुन आता सायलीची माफी मागणार आहे. पण, अर्जुनचं हे रूप पाहून सायली त्याला माफ करू शकेल का? ती अर्जुनसोबत परत जाईल का? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.