छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात झाला आहे. दिव्यांकासोबत तिचा पती विवेक दहिया देखील होता. त्यांच्या पीआरटीमने रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून अपघाताची माहिती दिली आहे. पण टीमने संपूर्ण माहिती दिलेली नाही. दिव्यांकावर उपचार सुरु आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
सोपबॉक्स पीआर टीमने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी विवेक दहियाच्या उद्या होणाऱ्या लाइव्ह विषयी माहिती दिली आहे. त्यांनी ते लाइव्ह पुढे ढकलले आहे. याच पोस्टमध्ये त्यांनी पुढे, अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात झाला आहे आणि सध्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत अशी माहिती देण्यात आली. तसेच विवेक तिच्यासोबत रुग्णालयात असल्यामुळे त्याचे लाइव्ह रद्द करण्यात येत आहे असे ते म्हणाले आहेत.
वाचा: ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार झाले भावूक
काही दिवसांपूर्वीच दिव्यांकाची लिगामेंट सर्जरी झाली होती. दिव्यांकाने या सर्जरीनंतरचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने लिगामेंट सर्जरी तिने लिगामेंट सर्जरी कशी झाली आणइ त्यानंतर ती कशी रिकव्हर होत आहे याविषयी माहिती दिली होती. आता दिव्यांकाचा अपघात झाल्यानंतर ती लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून चाहते देवाकडे प्रार्थना करत आहे.
वाचा: मुक्ता हिला इंद्राने काढले घराबाहेर, कार्तिकचा डाव त्याच्यावरच उलटणार का? प्रेमाची गोष्ट मालिकेत काय घडणार
दिव्यांकाने ये दिल चाहे मोअर या मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर तिने झी टीव्हीवरील बनू मैं तेरी दुल्हन या मालिकेत काम केले. या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली. या मालिकेतील भूमिकेसाठी पुरस्कार देण्यात आले होते. पण ये है मोहब्बते या मालिकेने दिव्यांकाला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले होते.
संबंधित बातम्या