मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांची ‘ती’ इच्छा आजही अपूर्णच, पुतण्याने केला होता खुलासा

दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांची ‘ती’ इच्छा आजही अपूर्णच, पुतण्याने केला होता खुलासा

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 13, 2024 08:21 AM IST

आज १३ एप्रिल रोजी दिवंगत अभिनेते सतिश कौशिक यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त पुतण्याने त्यांची शेवटची इच्छा काय होती हे सांगितले होते. त्याविषयी जाणून घेऊया त्यांच्याविषयी…

दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांची ‘ती’ इच्छा आजही अपूर्णच, पुतण्याने केला होता खुलासा
दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांची ‘ती’ इच्छा आजही अपूर्णच, पुतण्याने केला होता खुलासा

प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि निर्माते सतीश कौशिक यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. होळीच्या दिवशी सतीश कौशिश हे दिल्लीतील एका फार्म हाऊसवर पार्टी करण्यासाठी गेले होते. याच फार्महाऊसवर त्यांची प्रकृती ढासळ होती. त्यानंतर ९ मार्च २०२३ रोजी त्यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती वैद्यकीय तपासातून समोर आली. अचानक निधन झाल्यामुळे सतीश कौशिक यांची शेवटची इच्छा आजही अपूर्ण राहिली आहे. आता ती इच्छा कोणती चला जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

आज १३ एप्रिल रोजी सतीश कौशिक यांची जयंती आहे. ते जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे अनेक चित्रपट, जुन्या आठवणी कायम चाहत्यांच्या मनात जग्या आहेत. आजच्या दिवशी अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून सतीश कौशल विषयी भावनिक पोस्ट लिहित आहेत. चला जाणून घेऊया त्यांच्या विषयी...
वाचा: 'आजकाल केवळ दिखावा आणि फायद्यासाठी कलाकार लग्न करत आहेत', नोरा फतेही हिचे खळबळजनक विधान

सतीश कौशिक यांचे चित्रपट

सतीश कौशिक यांचा 'मिस्टर इंडिया' हा चित्रपट गाजला होता. या चित्रपटात त्यांनी कॅलेंडर ही भूमिका साकारली होती. त्यानंतर कॉमेडी चित्रपट 'दीवाना मस्ताना'मधील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. साजन चले ससुराल, राम लखन, बडें मियां, हसीना मान जाएगी, मिस्टर एंड मिसेस खिलाडी हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.
वाचा: ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सलमान खान याच्या घराबाहेर जमलेल्या चाहत्यांवर लाठीचार्ज

काय होती शेवटची इच्छा?

सतीश कौशिक यांची इच्छा होती की त्यांच्या आयुष्यावर आधारित एक पुस्तक प्रकाशित व्हावे. त्यासाठी ते निधनाच्या आधी जवळपास दोन वर्षे काम करत होते. त्यांच्या ऑटोबायोग्राफीचे प्लानिंग त्यांनी काही दिवसांपूर्वीच करुन ठेवले होते. दोन महिन्यांपासून ते या पुस्तकाची घोषण करण्याच्या तयारीत होते. मात्र ९ मार्च रोजी अचानक त्यांचे निधन झाले.
वाचा: प्रेक्षकांना कसा वाटला अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा 'बडे मियां छोटे मियां' सिनेमा? वाचा रिव्ह्यू

अचानक त्यांचे निधन झाले.

सतीश कौशिक यांचा पुतण्या निशांतने सतीश कौशिक यांच्या शेवटच्या इच्छेविषयी सांगितले होते. काकांची इच्छा होती की त्यांच्या जीवनावरील ऑटोबायोग्राफी लिहिली जावी. हरियाणा पासून ते मुंबई पर्यंतचा त्यांचा प्रवास या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांना दाखवायचा होता. त्यांचा अनुभव त्यांना इतरांसोबत शेअर करण्याची इच्छा होती. त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्व किस्से पुस्तकाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगायचे होते. ते स्वत: या पुस्तकावर काम करणार होते. त्यांना जेव्हा वेळ मिळत असे तेव्हा ते लिखाण करत असत. आता त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली आहे.

IPL_Entry_Point

विभाग