मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  लग्नाच्या १२ वर्षानंतरही अभिनेत्री मंदिरा बेदी आई होऊ शकली नाही, काय होते कारण ?

लग्नाच्या १२ वर्षानंतरही अभिनेत्री मंदिरा बेदी आई होऊ शकली नाही, काय होते कारण ?

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 15, 2024 07:49 AM IST

आज अभिनेत्री मंदिरा बेदी हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्या खासगी आयुष्याविषयी आपण जाणून घेऊया. एका मुलाखतीमध्ये मंदिराने लग्नाच्या १२ वर्षानंतरही का आई होऊ शकली नाही याविषयी सांगितले होते.

लग्नाच्या १२ वर्षानंतरही अभिनेत्री मंदिरा बेदी आई होऊ शकली नाही, काय होते कारण ?
लग्नाच्या १२ वर्षानंतरही अभिनेत्री मंदिरा बेदी आई होऊ शकली नाही, काय होते कारण ?

वयाची ५०शी ओलांडूनही अतिशय हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारी अभिनेत्री म्हणजे मंदिरा बेदी. फिटनेस आयकॉन म्हणून मंदिराकडे पाहिले जाते. मंदिरा एक उत्तर अँकर आणि अभिनेत्री सुद्धा आहे. तिने ‘शांती’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर तिची ‘क्यों की सास भी कभी बहुती’ विशेष गाजली होती. आज १५ एप्रिल रोजी मंदिराचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी...

ट्रेंडिंग न्यूज

१५ एप्रिल १९७२ रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या मंदिरा बेदीच्या वडिलांचे नाव वीरेंद्र सिंह बेदी आणि आईचे नाव गीता बेदी आहे. आपल्या फिटनेसबद्दल अनेकदा चर्चेत राहणारी मंदिरा बेदीला पाहून तिचे वय किती हा अंदाज बांधणे जवळपास अशक्य आहे. १९९४ मध्ये डीडी नॅशनलची प्रसिद्ध मालिका 'शांती'मधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या मंदिराने आयपीएल सिझन २चे अँकर म्हणून काम करत प्रसिद्धी मिळवली होती.
वाचा: सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराचं CCTV फुटेज आलं समोर, आरोपी दुचाकीवरून आला अन्...

मंदिराने एका चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने तिचा आई होण्याचा अनुभव लग्नानंतर तब्बल १२ वर्षांनी घेतला आल्याचा खुलासा केला. मंदिराने या मुलाखतीमध्ये त्यामागील कारणही सांगितले आहे. हे कारण ऐकून सर्वजण चकीत झाले आहेत.
वाचा: 'तारक मेहता..' मालिकेतील सोनूचा एअरपोर्टवर अतरंगी कारनामा, काही सेकंदामध्येच तयार केला टॉप

हिंदूस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मंदिरा बेदीने १९९९ मध्ये चित्रपट दिग्दर्शक राज कौशलशी लग्न केले होते. मात्र आई होण्यासाठी मंदिराला तब्बल १२ वर्षे वाट पाहावी लागली होती. ‘मी कंपनीसोबत केलेल्या करारामुळे २००१ मध्ये वयाच्या ३९व्या वर्षी मी माझ्या मुलाला जन्म दिला. मला अनेकदा भीती वाटायची की जर मी गर्भवती झाले तर माझ्या करिअरला पूर्ण विराम लागेल’ असे मंदिरा म्हणाली होती.
वाचा: बॉक्स ऑफिसवर 'बडे मियां छोटे मियां' सिनेमाचा धुमाकूळ, तीन दिवसातच कमावले इतके कोटी

पुढे मंदिरा म्हणाली, ‘कधीकधी मला हे मनोरंजन क्षेत्र क्रूर आहे असे वाटते. इथे कधी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. पण या इंडस्ट्रीमध्ये निभावण्यासाठी माझ्या नवऱ्याने मला सतत पाठिंबा दिला होता. त्याच्या पाठिंब्याशिवाय मी या इंडस्ट्रीमध्ये जगूच शकले नसते.’

IPL_Entry_Point

विभाग