मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ram Mandir Ayodhya: अयोध्येत झाली सुपरस्टार रजनीकांत आणि अनुपम खेर यांची भेट! व्हायरल होतोय फोटो

Ram Mandir Ayodhya: अयोध्येत झाली सुपरस्टार रजनीकांत आणि अनुपम खेर यांची भेट! व्हायरल होतोय फोटो

Jan 22, 2024 11:03 AM IST

Anupam Kher met Rajinikanth At Ayodhya: अनुपम खेर यांनी एक फोटो शेअर करून चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. अनुपम खेर आणि रजनीकांत यांचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Anupam Kher met Rajinikanth At Ayodhya
Anupam Kher met Rajinikanth At Ayodhya

Anupam Kher met Rajinikanth At Ayodhya: रामलल्लाच्या स्वागतासाठी आता संपूर्ण देश सज्ज झाला आहे. अयोध्येत आज दिवाळी साजरी होत आहे. या निमित्ताने मनोरंजन विश्वाचे अनेक दिग्गज कलाकार देखील अयोध्येत पोहोचले आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’ फेम अभिनेते अनुपम खेर देखील अयोध्येत पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी अयोध्येत रजनीकांत यांची भेट घेतली. दोघांच्या भेटीचा खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या भेटीने चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राम नगरी अयोध्येत गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरशः जत्रेचे वातावरण आहे. राम मूर्तीच्या स्थापनेपूर्वीच अयोध्येत लोकांची गर्दी होत आहे. आज प्रभू रामाच्या मूर्तीची स्थापना होणार आहे. या खास निमित्ताने नेते, राजकारणी आणि अभिनेते अयोध्येला पोहोचू लागले आहेत. बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार्स अयोध्येला पोहोचले आहेत. या यादीत आलिया रणबीर, विकी कतरिना, रोहित शेट्टी, जेसी श्रॉफ, अनुपम खेर, रजनीकांत, संजय लीला भन्साळी, कंगना रनौत आणि माधुरी दीक्षित यांसारख्या स्टार्सच्या नावांचा समावेश आहे. दरम्यान, अनुपम खेर यांनी एक फोटो शेअर करून चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. या फोटोमध्ये अनुपम खेर साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत पोज देताना दिसले आहेत. ‘आज खूप दिवसांनी मी माझ्या जुन्या मित्राला, रजनीकांत यांना श्री रामजन्मभूमी येथे भेटलो. जय श्री राम....’ या फोटोमध्ये दोघेही एकत्र हसताना दिसत आहेत. अनुपम खेर आणि रजनीकांत यांचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Ayodhya Prana Pratishtha: पाऊले चालती अयोध्येची वाट! आलिया-कतरिनासह बॉलिवूड कलाकार अयोध्यला रवाना

अनुपम खेर काश्मिरी पंडितांचं प्रतिनिधित्व करणार

अयोध्येला रवाना होण्यापूर्वी, अनुपम खेर यांना मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. आपल्या मनातील भावना व्यक्त करताना ते म्हणाले की, ‘खूप छान वाटत आहे. आपण सर्वांनी या दिवसाची खूप दिवसांपासून वाट पाहिली आहे. जय श्री राम.’ यावेळी अनुपम खेर यांनी एक मोठं वक्तव्य देखील केलं. अयोध्येत जाऊन संपूर्ण काश्मिरी पंडित समाजाचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे अनुपम खेर यांनी यावेळी म्हटले.

अनुपम खेर म्हणाले की, अयोध्येत ते त्यांच्या पूर्वजांचे, विशेषत: त्यांचे आजोबा पंडित अमरनाथजी यांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेवेळी अनुपम खेर आजोबांचे ‘फेरन’ घालणार आहेत. आपल्या आजोबांच्या काळापासून आपण या दिवसाची तयारी करत होतो आणि आज अखेर तो आनंदाचा दिवस आला आहे, असे अनुपम खेर म्हणाले.

टी-२० वर्ल्डकप २०२४