मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Namrata Shirodkar Birthday: नम्रता शिरोडकर मनोरंजन विश्वातून गायब का झाली? महेश बाबू ठरला होता कारण!

Namrata Shirodkar Birthday: नम्रता शिरोडकर मनोरंजन विश्वातून गायब का झाली? महेश बाबू ठरला होता कारण!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 22, 2024 07:47 AM IST

Happy Birthday Namrata Shirodkar: नम्रता शिरोडकरला अभिनयाचा वारसा तिला घरातूनच मिळाला होता. मनोरंजन विश्वात करिअर करायचं हे तिने आधीच ठरवलं होतं.

Namrata Shirodkar Birthday
Namrata Shirodkar Birthday

Happy Birthday Namrata Shirodkar: बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकर आज (२२ जानेवारी) तिचा ५२वा वाढदिवस साजरा करणार आहे. नम्रता शिरोडकरचा जन्म २२ जानेवारी १९७२ रोजी एका मराठी कुटुंबात झाला. नम्रताला सुरुवातीपासूनच अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती. नम्रता अशा कुटुंबातून जन्मली, ज्यांचे बॉलिवूडशी घट्ट नाते आहे. तिची मोठी बहीण प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आणि आजी प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी होत्या. त्यामुळे अभिनयाचा वारसा तिला घरातूनच मिळाला होता. मनोरंजन विश्वात करिअर करायचं हे तिने आधीच ठरवलं होतं.

अभिनेत्री नम्रता शिरोडकरने १९९३मध्ये ‘फेमिना मिस इंडिया’चा खिताब जिंकला. त्यानंतर नम्रताने १९९८मध्ये 'जब प्यार किसी से होता है' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. नम्रता 1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्या 'शिर्डी के साई बाबा' या चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. नम्रताने तिच्या करिअरमध्ये 'पुकार', 'वास्तव' आणि 'अस्तित्व' असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. करिअर यशाच्या शिखरावर असताना, २००५मध्ये जेव्हा तिने मनोरंजन विश्व कायमचे सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Viral Video: किती हा ढोंगीपणा! कंगना रनौतचा मंदिरातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; नेटकरी करतायत ट्रोल

नम्रता शिरोडकरने दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूसोबत लग्न करून तिच्या यशस्वी अभिनय कारकिर्दीला कायमचा रामराम ठोकला होता. नम्रता आणि महेश बाबू यांची पहिली भेट तेलुगु चित्रपट ‘वारिसू’च्या सेटवर झाली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नम्रता आणि महेश बाबू यांच्यात प्रेम फुलले. काही काळ डेट केल्यानंतर नम्रता आणि महेश बाबूने १० फेब्रुवारी २००५ रोजी लग्न केले. मात्र, लग्नाआधी महेशने नम्रतासमोर एक अट ठेवली होती की, लग्नानंतर तिला अभिनय करिअर सोडावे लागेल. याचा खुलासा खुद्द नम्रताने एका मुलाखतीदरम्यान केला होता.

नम्रता म्हणाली होती की, महेशने सुरुवातीपासूनच स्पष्ट केले होते की, त्याला काम न करणारी बायको हवी आहे. जर, मी एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असते, तरीही त्याने मला ती नोकरी सोडायला सांगितली असती. आमच्या दोघांमध्ये या मुद्द्यांवरून काही मतभेदही झाले होते. मात्र, या सगळ्यानंतर संसाराची सुरुवात झाली. महेश प्रमाणेच नम्रताने देखील एक अट घातली होती. लग्नानंतर एका अपार्टमेंट घरामध्ये राहायचं, अशी ती अट होती. कारण, महेश बाबूच्या भल्यामोठ्या बंगल्यात कसं राहायचं, या विचारानेच नम्रताला घाम फुटायचा. त्यामुळे पत्नीच्या इच्छेचा मान राखून अभिनेता देखील छोट्या अपार्टमेंटमध्ये राहू लागला होता.

WhatsApp channel

विभाग