Maharashtrachi Hasyajatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने मुंबईत घेतलं घर! पोस्ट शेअर करताना झाला भावुक!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Maharashtrachi Hasyajatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने मुंबईत घेतलं घर! पोस्ट शेअर करताना झाला भावुक!

Maharashtrachi Hasyajatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने मुंबईत घेतलं घर! पोस्ट शेअर करताना झाला भावुक!

Jan 21, 2024 02:42 PM IST

Maharashtrachi Hasyajatra Fame Actor New House: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने मुंबईत घर घेतलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

Maharashtrachi Hasyajatra Fame Actor New House
Maharashtrachi Hasyajatra Fame Actor New House

Maharashtrachi Hasyajatra Fame Actor New House: स्वप्नांचं शहर मायानगरी मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकालाच वाटत असतं. या शहरात घर घेण्यासाठी प्रत्येक जण मेहनत करत असतो. या स्वप्नाची पूर्ती झाली की, अवघं जग जिंकल्यासारखं वाटू लागतं. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने देखील मुंबईत हक्काचं घर विकत घेतलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर करताना अभिनेता भावूक झाला होता. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून अवघ्या महाराष्ट्राला खळखळवून हसवणाऱ्या अभिनेता रोहित माने याने मुंबईत हक्काचं घर खरेदी केलं आहे.

अभिनेता रोहित माने हा मूळचा साताऱ्याचा आहे. मात्र, कामाच्या निमित्ताने तो मुंबईत असतो. आता त्याने मुंबईत स्वतःचं घरच खरेदी केलं आहे. चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर करताना त्याने एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं की, ‘मी साताऱ्यात जन्माला आलो. तिथेच वाढलो. माझे वडील कामानिमित्त मुंबईत असायचे आणि आम्ही गावी. कुटुंबापासून किती दिवस लांब रहायचं म्हणून माझ्या बाबांनी आम्हाला मुंबईत आणलं. लहानपणापासून आम्ही बऱ्याच घरांमध्ये राहीलो, काही घरं आवडत नसतानाही नाईलाज म्हणून रहावं लागलं आणि काही घर खूप आवडत असतानाही नाईलाज म्हणून सोडावी लागली. त्या सगळया प्रवासात एक स्वप्न कायम सोबत असायचं आणि ते म्हणजे स्वतःच हक्काचं घर असावं, जे नाईलाज म्हणून सोडावं लागणार नाही आणि मनासारखं सजवता येईल. बरं त्यात निवडलेलं क्षेत्र इतकं अनप्रेडिक्टेबल आहे की, कधी घर घेण्याची हिंमतही झाली नाही.’

Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ बनवणाऱ्या आरोपीला अटक, अभिनेत्रीने मानले पोलिसांचे आभार!

पुढे अभिनेता लिहितो, ‘पण, श्रदधा तुझ्यासोबत लग्न झालं आणि ज्या हिंमतीने तू सगळं हातात घेतलंस त्यामुळे आणि त्यामुळेच हे शक्य झालंय. ही हिंमत आम्हाला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने दिली. आता मी हक्काने सांगू शकतो... होय हे आमचं घर आहे. स्वप्नपूर्तीचा हाच तो अनुभव. या सगळयात माझे आई वडील, माझे सासू सासरे, यांनी कायमचं आम्हाला दिलेली साथ मी कधीच विसरु शकणार नाही. तुम्हा सगळ्यांचे आर्शिवाद आणि शुभेच्छा कायम आमच्या सोबत असू दया. कायम असंच प्रेम करत रहा. या प्रवासात सोबत असणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही आभारी आहोत. एका स्वप्नाचा प्रवास पुर्ण होतोय पुढच्या स्वप्नांकडे जाण्याचा ध्यास ठेवून..’

रोहित मानेच्या या पोस्टवर चाहते आणि त्याचे सहकलाकार भरभरून प्रतिक्रिया करत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Whats_app_banner