Viral Video: किती हा ढोंगीपणा! कंगना रनौतचा मंदिरातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; नेटकरी करतायत ट्रोल
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: किती हा ढोंगीपणा! कंगना रनौतचा मंदिरातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; नेटकरी करतायत ट्रोल

Viral Video: किती हा ढोंगीपणा! कंगना रनौतचा मंदिरातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; नेटकरी करतायत ट्रोल

Jan 21, 2024 02:46 PM IST

Kangana Ranaut Viral Video: इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये कंगना रनौत हनुमान गढी मंदिरात झाडू मारताना दिसत आहे.

Kangana Ranaut Viral Video
Kangana Ranaut Viral Video

Kangana Ranaut Viral Video: बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत असते. कंगना अतिशय धार्मिक देखील आहे. अभिनेत्री अनेकदा सोशल मीडियावर भक्तीत लीन असतानाचे फोटो शेअर आणि व्हिडीओ शेअर करते असते. आता थेट अयोध्येतून तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री कंगना रनौत मंदिरात काम करताना दिसली आहे. मात्र, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता कंगना रनौत चांगलीच ट्रोल होत आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये ती हनुमान गढी मंदिरात झाडू मारताना दिसत आहे.

कंगना रनौतचा मंदिरात झाडू मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोक कंगना रनौतच कौतुक करत आहेत. तर, काही लोक अभिनेत्रीवर चांगलीच टीका करत आहेत. कंगना ज्या पद्धतीने मंदिरात झाडू मारत आहे, त्यावर ती दिखाऊपणा करत असल्यासारखे वाटते आहे. कंगना रनौत नुकतीच नटूनथटून अयोध्येत पोहोचली होती. यावेळी तिने एक सुंदर साडी नेसली होती. इतकेच नाही तर, कंगनाने हेवी मेक-अप सोबत भरजरी दागिने आणि गॉगलही घातले होते. आता याच लूकमध्ये हातात झाडू घेऊन सफाई करणारी कंगना ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

Maharashtrachi Hasyajatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने मुंबईत घेतलं घर! पोस्ट शेअर करताना झाला भावूक!

या व्हिडीओवर कमेंट करत एका यूजरने लिहिले की, 'जड मेकअप, दागिने, सनग्लासेस घालून मंदिराची स्वच्छता कशी काय बरं केली जाते? एकाने लिहिले, ‘गॉगल लावून ती नक्की काय साफ करत आहे, हे कोणी स्पष्ट करू शकेल का? ते आधीच खूप स्वच्छ ठेवलेले ठिकाण आहे. कदाचित तिला तिचा मेंदू साफ करून घेण्याची गरज आहे, जर तो असेल तर... तिथे धूळ/कचरा नक्की कुठे आहे, ते कुणीतरी तिला दाखवा. हा ढोंगीपणा का चालला आहे तेच समजत नाही. जर, तिने गॉगल काढून पाहिलं तर तिला बरीच ठिकाणे सापडतील, जिथे खरोखर साफसफाई करणे आवश्यक आहे.’

आणखी एक जण कमेंट करत म्हणाला की, 'गॉगल घालून मंदिराची स्वच्छता केल्याने जास्त पुण्य मिळते वाटतं.' आणखी एक कमेंट करत एका व्यक्तीने लिहिले की, 'काय अप्रतिम शो आहे, मॅडम पाणी ओतल्यावर झाडून घेत आहेत. जर, स्वच्छता करायचीच असेल, तर ती व्यवस्थित करा.’ कंगना रनौतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

Whats_app_banner