मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘आमच्या पप्पांनी गंपती आणला’ गाण्यामधील चिमुकला साईराज याचे नशीब फळफळले! दिसणार 'या’ मालिकेत

‘आमच्या पप्पांनी गंपती आणला’ गाण्यामधील चिमुकला साईराज याचे नशीब फळफळले! दिसणार 'या’ मालिकेत

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 27, 2024 08:17 AM IST

काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या 'आमच्या पप्पांनी गंपती आणला’ गाण्यामधील चिमुकला साईराज आता मालिकेत दिसणार आहे. त्याची मालिका कोणती? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

‘आमच्या पप्पांनी गंपती आणला’ गाण्यामधील चिमुकला साईराज याचे नशीब फळफळले! दिसणार 'या’ मालिकेत
‘आमच्या पप्पांनी गंपती आणला’ गाण्यामधील चिमुकला साईराज याचे नशीब फळफळले! दिसणार 'या’ मालिकेत

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. या व्हिडीओंमुळे अनेकांचे रातोरात आयुष्य बदलून जाते. काही प्रसिद्धीचा शिखरावर पोहोचतात तर काहींच्या करिअरला एक वेगळी ओळख मिळते. असेच काहीचे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'आमच्या पप्पांनी गंपती आणला’ गाण्यातील चिमुकल्या साईराज केंद्रचे झाले आहे. या चिमुकल्या मुलाचे हे गाणे सोशल मीडियावर तुफान हिट ठरले होते. आता त्याला एका मालिकेची ऑफर मिळाली आहे. आता ही मालिका कोणती असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे मूळ गाणे माऊली घोरपडे आणि शौर्या घोरपडे या दोन भावंडांनी गायले आहे. गाण्याची चर्चा तर झालीच. पण गाण्यावर डान्स करणाऱ्या साईराज केंद्रेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. साईराजचे गोंडस व निरागस हावभाव पाहून सर्वजण चकीत झाले. आता साईराजचे नशीब फळफळले आहे. त्याला झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आहे.
वाचा: पोझ देत असताना जोरात वारा आला अन्...; ऊप्स मोमेंटची शिकार झाली हृतिकची पूर्व पत्नी सुझान खान

साईराज झळकणार मालिकेत

साईराज ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘अप्पी आमची कलेक्टर’ मध्ये दिसणार आहे. तो अप्पीच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. अप्पीची उत्तराखंडला बदली झाली आहे. त्यामुळे मालिकेत जवळपास सात वर्षांचे लीप आणण्यात आले आहे. अप्पीच्या मुलाच्या म्हणजेच अमोलच्या भूमिकेत साईराज दिसणार असल्यामुळे सर्वांना आनंद झाला आहे.
वाचा: ट्रेंडमध्ये असलेले 'गुलाबी साडी' हे गाणे कोणी गायले आणि कसे सुचले माहिती आहे का? जाणून घ्या

अप्पीची झाली उत्तराखंडला बदली

आईबद्दल गोष्टी लपवल्यामुळे अर्जुन अप्पीला उत्तराखंडला निघून जाण्यास सांगतो. तो मात्र तिकडेच राहायच निर्णय घेतो. अर्जुन अप्पीला सांगतो की अमोलला त्याचा बाबा हरवला आहे असे सांगण्याचे वचन देतो. जेणेकरून तो अप्पीलाच आई व बाबा मानून जगायला शिकेल. जसा अर्जुन स्वतः त्याची आई गेल्यावर विनायकलाच आई-बाबा समजून इतके दिवस जगत आला होता. अप्पीपुढे काहीही पर्याय नसल्याने ती अमोलला घेऊन उत्तराखंडला निघून जाते. ती तेथे चांगली रमते. उत्तराखंडमधील सामान्य लोक अप्पीच्या कामाचे कौतुक करत असतात. आता मालिकेत ७ वर्षांचे लीप आले आहे.
वाचा: थिएटरमधील चित्रपटात आता जाहिरातींचा अडथळा नाही! पीव्हीआर आयनॉक्सचा मोठा निर्णय; काय आहे कारण?

IPL_Entry_Point