मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rajinikanth Temple: 'थलायवा'चा जबरा फॅन! चाहत्याने घरात बांधलं रजनीकांत यांचं मंदिर

Rajinikanth Temple: 'थलायवा'चा जबरा फॅन! चाहत्याने घरात बांधलं रजनीकांत यांचं मंदिर

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 02, 2023 08:24 AM IST

Fan Built Rajinikanth Temple:एका जबरा फॅनने चक्क घरातच सुपरस्टार रजनीकांत यांचं मंदिर बांधलं आहे. या मंदिरात त्याने रजनीकांत यांची मूर्ती बसवली आहे.

Fan Built Rajinikanth Temple
Fan Built Rajinikanth Temple

Fan Built Rajinikanth Temple: भारतातच नव्हे, तर जगभरात अभिनेते रजनीकांत यांचे चाहते आहेत. रजनीकांत यांची चाहत्यांमध्ये तुफान क्रेझ आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्यासाठी काहीही करायला तयार असतात. आता अशाच एका जबरा फॅनने चक्क घरातच सुपरस्टार रजनीकांत यांचं मंदिर बांधलं आहे. या मंदिरात त्याने तब्बल २५० किलो वजनाची रजनीकांत यांची मूर्ती बसवली आहे. सध्या सोशल मीडियावर या मूर्तीची चर्चा पाहायला मिळत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मेगास्टार रजनीकांत यांचा हा जबर फॅन तामिळनाडूतील मदुराईमध्ये राहतो. त्याने मदुराईतील आपल्या घरात पूर्णपणे रजनीकांत यांना समर्पित असे मंदिर बांधले आहे. स्वतःला रजनीकांत यांचा मोठा चाहता म्हणवणाऱ्या कार्तिक यांनी आपल्या घराचा एक मोठा भाग मंदिरामध्ये बदलून टाकला आहे. या मंदिरात त्याने साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची मूर्ती स्थापित केली आहे. राजनीकांतच आमचे देव आहे, आम्ही त्यांचीच पूजा करणार, असे या चाहत्यांचे म्हणणे आहे.

Shah Rukh Khan Birthday: शाहरुख खानने नाकारलेले 'हे' चित्रपट नंतर ठरले सुपरडुपर हिट! पाहा यादी...

कार्तिक यांच्या घरात स्थापित करण्यात आलेल्या या मूर्तीचे वजन तब्बल २५० किलो इतके आहे. या मंदिराबद्दल सांगताना कार्तिक म्हणतात की, 'आमच्यासाठी रजनीकांत देवासमान आहेत. त्यांच्या सन्मानार्थ आम्ही हे मंदिर बनवले आहे.' कार्तिकच नव्हे, तर त्यांची मुलगी अनुशिया देखील रजनीकांत यांची मोठी फॅन आहे. तिने देखील बोलताना म्हटले की, ‘आम्ही रजनीकांत यांच्या मूर्तीची अशी पूजा करतो, जशी एखाद्या देवाच्या मूर्तीची करतो.’

कार्तिक यांच्या मदुराईतील घरातील या मंदिराचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जगभरातील रजनीकांत फॅन्स या मंदिराचे कौतुक करत आहेत. या मंदिराचे फोटो जोरदार शेअर केले जात आहेत. तर, आता या मंदिरात आपल्यालाही जायचे आहे, असे अनेक चाहत्यांनी म्हटले आहे.

IPL_Entry_Point