मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: रजनीकांतसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल, चाहते बुचकळ्यात

Viral Video: रजनीकांतसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल, चाहते बुचकळ्यात

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 23, 2023 06:40 PM IST

Rajinikanth Lookalike: सध्या सोशल मीडियावर दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओपाहून चाहते देखील चकीत झाले आहे.

Rajinikanth
Rajinikanth

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून रजनीकांत हे ओळखले जातात. सातासमुद्रापार त्यांची लोकप्रियता पाहायला मिळते. त्यांनी आजवर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा एखादा चित्रपट प्रदर्शित होणार असेल तर चाहत्यांमधील उत्सुकता पाहण्यासारखी असते. सध्या सोशल मीडियावर रजनीकांत यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील व्यक्ती ही हुबेहुब रजनीकांत यांच्यासारखी दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एका यूजरने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती ही रजनीकांत यांच्यासारखी दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहते चकीत झाले आहेत. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीविषयी फार माहिती समोर आलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ केरळ येथील कोचीमधील आहे. तसेच रजनीकांत सारखी दिसणारी व्यक्ती ही चहा विकण्याचे काम करते.
वाचा: भूत-प्रेत अन् हॉररचा तडका; 'या' पाच वेब सीरिज नक्की बघा!

व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील व्यक्तीने निळ्या रंगाचा शर्ट, शॉट्स आणि चप्पल घातली आहे. ही व्यक्ती रस्त्याच्या शेजरी उभी आहे. तसेच या व्यक्तीची हेअरस्टाइल ही हुबेहुब सुपरस्टार रजनीकांतसारखी आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच यूजर चकीत झाले आहेत. एका यूजरने कमेंट करत 'ही व्यक्ती तर रजनीकांत सारखी दिसत आहे' असे म्हटले. तर दुसऱ्या एका यूजरने 'नक्की ही व्यक्ती कोण आहे?' असा सवाल उपस्थित केला आहे.

७२ वर्षीय सुपरस्टार रजनीकांत विषयी बोलायचे झाले तर लवकरच त्याचा 'लाल सलाम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट रजनीकांतची मुलगी ऐश्वर्याचा आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारी २०२४मध्ये प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग