Satyashodhak Poster Out: मोठ्या पडद्यावर 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार महात्मा ज्योतिराव फुले!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Satyashodhak Poster Out: मोठ्या पडद्यावर 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार महात्मा ज्योतिराव फुले!

Satyashodhak Poster Out: मोठ्या पडद्यावर 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार महात्मा ज्योतिराव फुले!

Nov 01, 2023 02:23 PM IST

Satyashodhak Marathi Movie Poster Out: महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Satyashodhak Marathi Movie Poster Out
Satyashodhak Marathi Movie Poster Out

Satyashodhak Marathi Movie Poster Out: समाजातील स्त्रियांना शिक्षणाचा मूलमंत्र देणारे आणि प्रत्येक 'ती'ला उंच भरारी घेण्यासाठी दिशा दाखवणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रत्येक स्त्री सुशिक्षित झालीच पाहिजे असा आग्रह धरून, समाजाचा विरोध पत्करून हाती घेतलेलं काम पूर्ण करणाऱ्या ज्योतिबा आणि सावित्रीबाईंचा जीवन प्रवास आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटात अभिनेते संदीप कुलकर्णी हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून, चित्रपटातील संदीप कुलकर्णी यांचा फर्स्ट लूक प्रेक्षकांना दाखवण्यात आला आहे. काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. टीझर रिलीजनंतर या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती. महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका नक्की कोणता अभिनेता साकारणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. प्रेक्षकांची हीच उत्सुकता आता फारकाळ न ताणता अखेर अभिनेत्याची पहिली झलक प्रेक्षकांना दाखवण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ५ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Karwa Chauth 2023: बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींना 'करावा चौथ' वाटतो अंधश्रद्धा! म्हणतात...

‘सत्यशोधक’ या चित्रपटाच्या पोस्टरवर अभिनेते संदीप कुलकर्णी 'महात्मा ज्योतिराव फुले' यांच्या रूपात दिसले आहेत. त्यांना पाहून समोर साक्षात ज्योतिरावचं उभे आहेत का, असा भास होतो. अभिनेते संदीप कुलकर्णी या भूमिकेत चपखल बसले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या आधी हा चित्रपट अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये वाहवा मिळवून आला आहे.

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. इंग्लंडमधील पेन्झान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'सर्वोत्कृष्ट बायोग्राफीकल फिचर फिल्म', तर जर्मनीत होहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'द्वितीय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' हा पुरस्कार या चित्रपटाने पटकावला आहे.

Whats_app_banner