Jio World plaza launch in Mumbai: देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने भारत देशातील सर्वात मोठा मॉल मुंबईत सुरू केला आहे. नुकताच या मॉलचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडच्या सगळ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. याचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी मुकेश अंबानी यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह या सोशल्याला हजेरी लावली होती. या वेळी भव्य रॅम्प वॉकचे आयोजन करण्यात आले होते. या रॅम्प वॉकमध्ये अनेक कलाकारांनी भाग घेतला होता.
'जिओ वर्ल्ड प्लाझा' मॉलच्या या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये स्टार्स व्यतिरिक्त, क्रिकेटर्स आणि उद्योगपतींनी देखील रेड कार्पेटवर आपली उपस्थिती दर्शवली होती. सलमान खानपासून, दीपिका पदुकोणपर्यंत आणि जान्हवीपासून सोनम कपूरपर्यंत अनेक स्टार्सनी रेड कार्पेटवर आपली जादू दाखवली. आलीय भट्ट आणि रणवीर सिंह यांनी देखील या रॅम्पवर ढांसू एंट्री घेतली. सध्या या सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
'जिओ वर्ल्ड प्लाझा' या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये अनेक स्टार्सची देसी स्टाईल बघायला मिळाली. तर, काही कलाकार वेस्टर्न स्टाईलमध्ये कमाल दिसले आहेत. या इव्हेंटमध्ये रणवीर सिंह काळ्या रंगाची धोती पॅन्ट आणि कोटमध्ये दिसला होता. तर, दुसरीकडे शहनाज गिलही लाल गाऊन ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. अभिनेत्री अथिया शेट्टी, वडील सुनील शेट्टीसोबत क्रॉप टॉप आणि प्रिंटेड कोट पँटमध्ये पोज देताना दिसली.
संबंधित बातम्या