लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकासआघाडी आणि महायुतीत लोकसभेच्या जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महायुतीत भाजपने आघाडी घेत २३ उमेदवार जाहीर केले आहेत. शिंदे गटाकडून अजूनपर्यंत आपले पत्ते खोलले नाहीत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही लोकसभेसाठी पहिला उमेदवार जाहीर केला आहे.
रायगड मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गटात कलह सुरू असतानाच अजित पवार यांनी आपला पहिला उमेदवार रायगड जिल्ह्यातूनच जाहीर केला आहे. यावर भाजप व शिंदे गट काय भूमिका घेणार, हे पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी पहिला उमेदवार जाहीर केला असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष रायगडमधून उमेदवारी दिली आहे. अजित पवार म्हणाले, महायुतीतील जागावाटप जवळपास ९९ टक्के निश्चित झाले आहे. २८ मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन महायुतीतील जागावाटप जाहीर केले जाईल. सध्या राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर केला असून अन्य उमेदवारांची घोषणा २८ मार्च रोजी केली जाईल.
महायुती ४८ जागांवरील उमेदवारांची घोषणा २८ तारखेला करण्यात आली. राष्ट्रवादीची दुसरी जागा शिरुरची जाहीर केली जाईल. महायुतीतील मित्र पक्षांनी जागा वाटपाबाबत सहकार्य केलं असून आमदार व मंत्र्यांवर निवडणुकीची जबाबदारी असेल. पक्षाचे स्टार प्रचारकांची नावे लवकरच जाहीर केली जातील.