NCP Ajit Pawar election symbol : काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला बहाल केले होते. मात्र आताअजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरण्यास मनाई केली आहे. हा निर्णय लक्षद्वीप पुरता मर्यादित आहे. घड्याळ चिन्हासाठी विलंबाने अर्ज दाखळ झाल्याने लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी त्यांनी पक्षाचे निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही. लक्षद्वीपमध्ये १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
अजित पवार गटाला लक्षद्वीपमध्ये घड्याळ चिन्ह वापरण्यास परवानगी नसली तरी महाराष्ट्र वनागालँडमध्ये घड्याळ चिन्ह वापरण्यास कोणतीही अडचण नाही. लोकसभा निवडणुकीत घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्या परवानगी मिळावी यासाठी अजित पवार गटाने अर्ज केला होता. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना २० मार्च रोजी जाहीर झाली तर अजित पवार गटाने २४ मार्च रोजी चिन्हासाठी अर्ज केला. यासाठी १ दिवस विलंब झाल्याने त्यांना निवडणूक चिन्ह नाकारण्यात आले आहे. चिन्ह आदेश परिच्छेद १० नुसार निवडणुकांची अधिसूचना जारी झाल्यानंतर तीन दिवसापर्यंत अर्ज करावा लागतो.
जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला खरी राष्ट्रवादी असल्याचे म्हणत त्यांना चिन्ह प्रदान केला. तर शरद पवार गटाला नवं नाव तसेच तुतारी फुंकणारा माणूस हे निवडणूक चिन्ह मिळालं.
राष्ट्रवादीला लक्षद्वीपमध्ये घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही. मात्र, महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या सर्व ट्प्प्यांसाठी घड्याळ वापरता येणार आहे. राज्यात राष्ट्रवादी ५ जागा मिळण्याची शक्यता आहे. बारामती, मावळ, शिरुर, रायगड व परभणी मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या